कृषी संजीवनी मोहीम कुंटूर येथे संपन्न

32

✒️चांदू आंबटवाड(नायगाव ता.प्रतिनिधी)मो.9307896949

कुंटूर(दि.30जून):- नायगाव कृषी कार्यालय आयोजित कृषी संजिवनी मोहीम दि:-२९/०६/२०२१ रोजी कुंटूर येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमात शेतकऱ्यांना सोयाबीन,कापूस, उडीद, मुग, ऊस,फळ बाग,एक गाव एक वाण पध्दत अशा अनेक प्रकारच्या वाणाचे बिज प्रक्रिया, व पिकांचे व्यवस्थापण कसे करावे, खत व्यवस्थापन कसे करावे, खतांचा मात्रा किती असावा या विषयी माहिती उपविभागीय अधिकारी सोनटक्के साहेब, तालुका कृषी अधिकारी शिंगाडे साहेब यांनी सविस्तरपणे मनोगतात सांगितले आहे. आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंटूर नगरीचे सरपंच प्रतिनिधी मारोतराव पा.कदम कुंटूरकर होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करतांना कृषि विभागा अंतर्गत सर्व प्रकारच्या योजना शेतकऱ्यां पर्यंत देण्यासाठी कृषी विभागाने तत्पर असावे आणि शेती विषयी अवजारे, ट्रॅक्टर अवजारे, बियाणे, अशा प्रकारच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत भेटायला पाहीजे याची ,जबाबदारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे तालुक्यातील सर्व कृषी दुकानात सेफ्टी किट देण्यासाठी सूचना देण्यात यावे.असे मत व सूचना कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव पा.कदम कुंटूरकर यांनी उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना करण्यात आले. या वेळी उपस्थित तर प्रमुख उपस्थिती कुंटूर चे उपसरपंच मा.शिवाजी पा.होळकर, ग्राम पंचायत सदस्य दत्तात्र्य नालिकंटे, पत्रकार शंकर पा.आडकीने, पत्रकार बालाजी हाणमंते,पत्रकार दिगंबर झुंबाडे, व कुंटूर व कुंटूर परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन शेख साहेब यांनी केले तर आभार कृषी सहाय्यक भुताळे साहेब यांनी मांडले आहे.