लोकशाहीचे शोषण भांडवलदाराचे पोषण

26

“आमचे भांडण हे नेहमी तत्वासाठी असते.सहा कोटी अस्पृश्य समाजाच्या वतीने आमचे भांडण आहे.आम्हाला राजकिय संरक्षण पाहिजे आहे.हे राजकिय संरक्षण अशा तऱ्हेचे पाहिजे की,मूर्खांच्या हातून किंवा लबाडांच्या हातून आमचे काहीही नुकसान होता कामा नये.आमच्या चळवळीमध्ये मुर्खाला किंवा लबाडाला थोडादेखील वाव नाही.लुच्च्या -लफंग्याला जागा मिळणार नाही अशा तऱ्हेची चळवळ आम्हाला करावयाची आहे.इतर लोकांप्रमाणे आम्हालाही स्वातंत्र्य पाहिजे.आम्हाला कोणाचीही-परकीयांची किंवा स्वकियांची गुलामगिरी पत्करायची नाही.आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे.परंतु त्याच बरोबर आम्हाला लोकशाहीदेखील पाहिजे आहे.”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
पृ.क्र.३६६,खंड -२०

भारत सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश.सिंधू सभ्यता व बुध्द् शासन सभ्यतेत हा देश प्रगतीपथावर होता.सिंधु सभ्यतेतील प्रशासन व नगररचना उच्च विकसित होती.जगासोबत तेव्हाही देशाचा व्यापर चालत होता.बुध्दधम्म विचाराची ध्वजा जगात पोहचविण्याचे काम महेंद्र व संघमित्रा यांनी केले होते.नालंदा विद्यापीठात जगातील अनेक विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी येत होती.या देशाने जगाला शांती ,प्रेम , बंधूभाव व अहिंसा यांची शिकवण दिली.पण काही विकृत समाजव्यवस्थेतील अन्यायकारी ग्रंथानी इथल्या मुलनिवासी बांधवाना गुलामगिरीचं आयुष्य जगायला लावलं. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने देशातील सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,राजकिय,सांस्कृतीक ,व धार्मिक पायाला उध्दवस्त करून स्वतःची विचारसरणी बिंबवली.हजारोवर्षापासून ही शोषणकारी व्यवस्था या देशावर राज्य करत होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,”लोकशाही हवी असेल तर चातुर्वर्ण्य नाहीसे झाले पाहिजे.हे चातुर्वर्ण्याचे जंतु काढून टाकण्याकरिता बुध्दाच्या तत्वज्ञानासारखे मारक रसायन नाही.” ही विचारसरणी देशातील जनतेने स्वीकारली पाहिजे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चातुर्वर्ण्य व्यवस्था समाप्त करून भारताने लोकशाही समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था स्वि़कारली.समतामुलक देश निर्माण करण्याचे अभिवचन जनतेला दिले .तरी अजूनपर्यत जनतेत देशाभिमान जागृत होऊ शकला नाही.स्वतःचा धर्म व जात यामधून तो निघू शकला नाही.

आज लोकशाही व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी तीचे सातत्याने शोषण केले जात आहे.वर्तमान शासकांनी लोकशाहीचे सारे स्तभं आपल्या कवेत केल्याने स्वःताचे व भांडवलदारांचे पोषण मोठ्याप्रमाणात होत आहे.बहुसंख्य लोकांना धर्माच्या नशेत गुंग ठेऊन स्वतःची प्राचीन सभ्यता निर्माण करण्याचे कटकारस्थान खेळले जात आहे.लोकशाहीचे सारे फायदे घेऊन तिचेच शोषण केले जात आहे.सार्वजनिक सारे क्षेत्र कवडीमोलभावाने विकल्या जात आहेत.भांडवलदाराच्या षोषणासाठी नवीन कायदे केले जात आहे.अभावग्रस्त लोकांना वाऱ्यावर सोडून श्रीमंत लोकांच्या कल्याणासाठी झटणारे हे सरकार नक्कीच गरीबद्राेही आहे.योजनाचा सुळसुळात तयार करून लोकात भ्रम निर्माण करून वास्तव भारतापासून लपविल्या जात आहे.

लोकशाही व्यवस्था देशातील सर्व नागरिकांचा आमूलाग्र बदल घडवणारी व्यवस्था असते.हीच व्यवस्था आपण स्वीकारली आहे.तरी विकासाचा ग्राफ असमान आहे.संविधानकर्त्यांनी राजकारण्याला जे अधिकार दिले ते अधिकार न वापरता आपल्या मर्जीने देश कारभार चालत आहे.बहुमताच्या आसुरी जोरावर देशातील लोकशाही समाजवादी व्यवस्था उलथवून हुकूमशाही मनुव्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.देशात नवीन दंगलशास्त्र,शिक्षणशास्त्र व विषम विचारशास्त्र निर्माण केले जात आहे.भांडवलदारासाठी हे सरकार गालीचा टाकत असतांना लोकशाही मानणाऱ्या लोकांच्या रस्त्यावर काटे बसवत आहेत,खिळे टोचत आहे.हे कार्य असैंवधानिक असतांना त्यांना जाब विचारण्याची ताकत कोणात दिसून येत नाही.पूर्वग्रदुषित ध्येयशुन्य लक्ष्यामुळे लोकशाही विकलांग होत आहे.लोकशाहीचे शोषण होत असून भांडवलदाराचे पोषण होत आहे.
आतातरी आपले डोळे उघडायला हवे.देश पहिले की धर्म याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे.देश वाचला तर माणूस वाचेल , माणूस वाचला तर देश व जग वाचेल.चला तर मित्रांनो देश वाचवू या . पुढील लक्ष मेंदूत घेऊन नवा विद्रोह व क्रांती करू या .भारतीय लोकशाहीला वाचवू या .आळासात लोळत बसण्यापेक्षा नव्या परिवर्तनाची मशाल प्रज्वलीत करू या.तूर्तास थांबतो…!

✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००