आमदार समिर कुणावार यांचे उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र पोहना येथे कोरोनायोद्धयांचा गौरव

57

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.२जुलै):-संपुर्ण जग हे कोरोना महामारीशी लढा देत असतांना काही कोरोनायोध्यांनी आपल्या जिवाची तमा न बाळगता जनतेची सेवा देत मोलाची कामगिरी केली आहे.तसेच काहींनी तन,मन,धन अर्पित करुन कोविडकाळात सेवाकार्य अविरत सुरुच ठेवले आहे.अशा कोरोनाकाळात प्रशंसनीय कार्य करणाऱ्या कोविड योद्धयाचा काल दि.१ रोजी कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांचे प्रमुख उपस्थितित हृदय सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रम पोहणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी कोरोनाकाळात स्वतःचे जीवाची तसेच कुटुंबियांच्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय अधिकारी,परिचारिका,आशा स्वयंसेवीका,अंगणवाडी कार्यकर्ता तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधितांना आरोग्यसेवा प्रदान केली.या कोरोनायोद्धयांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचेवेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार समीर भाऊ कुणावार, जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती माधवराव चंदनखेडे, पंचायत समिती सभापती सौ. शारदाताई आंबटकर , माजी पंचायत समिती सभापती गंगाधरराव कोल्‍हे, जिल्हा परिषद सदस्य ज्योत्स्नाताई सरोदे, वंदना मडावी पंचायत समिती सदस्य,वैद्यकीय अधिकारी नितल भोला,डॉ.नीतिन मॅकलवार, पोहणा येथील सरपंच नामदेव राऊत, तालुका भाजपा महामंत्री विनोद विटाळे, विकी राऊत, भाग्येश देशमुख तसेच पोहणा सर्कलच्या सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पोहणा सर्कलचे सर्व सरपंच, कार्यकर्ते, गावकरी मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते.