दोन लाख नव्यानव हजाराच्या मुद्देमालासह सहा जुगारी जेरबंद,तीन फरार

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6जुलै):-  पो. स्टे. ब्रम्हपुरी अंतर्गत कहाली रोड वीटभट्टी जवळ पो. स्टे च्या विशेष पथकाने जुगारावर धाड टाकून कारवाई केली.सदर कारवाईत आरोपी 1 प्रवीण दोनाडकर रा. दिघोरी 2 आशिष पिल्लेवान 3 आदर्श बनकर 4 आजाद लोखंडे तिघेही रा.कहाली 5 नरेंद्र मेश्राम 6 उमेश रावेकर दोन्ही रा. ब्रह्मपुरी असे एकूण सहा आरोपी जुगार खेळताना मिळून आले तर उर्वरित तीन आरोपी हे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

सदर कारवाईत जुगारातील वीस हजार 600 रुपये नगदी तसेच आरोपींच्या ताब्यातील मोबाईल एकूण किंमत अंदाजे 24 हजार रुपये तसेच घटनास्थळी मिळून आलेल्या एकूण पाच मोटर सायकल, किंमत दोन लाख 55 हजार रुपये असा एकूण दोन लाख 99 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळून आलेले नमूद सहा आरोपी व पळून गेलेले तीन आरोपी अशा एकूण नऊ आरोपीवर मुंबई जुगार कायदा कलम 12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची कारवाई मा.सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री अनुज तारे, पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री आशिष बोरकर ,पो.हे.का नरेश रामटेके ,रवींद्र पिसे, ना.पो.का उमेश बोरकर, मुकेश गजबे ,नितीन भगत,पो.का नरेश कोडापे ,प्रमोद सावसाकडे ,प्रकाश चिकराम यांच्या पथकाने केली.