झाडे लावू!

70

पाहू जाता वरवर नुसती कविता।
पण समाजभान ते समजून घेऊ।
संकटावरी संकटे अंगांग पोळता।
चिंता उद्याची करता आज झाडे लावू।।१।।

झाडेझुडे देती दवा अन् शुद्ध हवा।
भाजीपाला फुले फळे मुळे गोड प्याऊ।
मिळे मध गोड गोड रानाचा रानमेवा।
जगण्या आम्हा अति मोलाचा प्राणवायू।।२।।

वृक्षाविणा जगणे नरा रे कष्ट होय।
जल जमीन जंगल त्याची देण भाऊ।
संरक्षण संवर्धनाने त्याची करू सोय।
भूमीवरी ती लावू वाढाया प्राणवायू।।३।।

जन्म मिळो मृत्युलोकी आस धरी देव।
फुलली पृथ्वी यासम स्वर्ग कोठे पाहू?
सृष्टीसौंदर्य मेले देता रे मुळी घाव।
ऊठ माझ्या भावा, एकेक रे झाडे लावू।।४।।

आरोग्य बिघडता मरतो किड्यावाणी।
लाखो मोजून घेशी कृत्रिम प्राणवायू।
वृक्ष कशी सोयरी? जाणावी संतवाणी।
अधांतरी उडू नको ठेव भुई पाऊ।।५।।

रम्य भू झाडांनी पर्यावरण प्रसन्न।
सृष्टी सुंदर कशी? अन्नान्न दशे जाऊ।
म्हणे ‘कृगोनि’ झाले आज हे निष्पन्न।
स्रोत हेचि प्राणवायूचे या झाडे लावू।।६।।

✒️कवी:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी – ‘कृगोनि’
मु. पो. ता. जि. गडचिरोली.मधुभाष क्र. ९४२३७१४८८३.