मोदी सरकार करणार सहकार मंत्रालयाची स्थापना

32

🔹सहकारातून समृद्धीचे व्हिजन साकार करण्यासाठी करण्यात येणार सहकार मंत्रालयची निर्मिती

✒️नवी दिल्ली/विशेष प्रतिनिधी(अतुल उनवणे)

नवी दिल्ली(दि.7जुलै):-मृद्धीचं आपलं व्हिजन गाठण्यासाठी केंद्र सरकारनं सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. तशी घोषणाच आज केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचं वृत्त पुरोगामी संदेश डिजिटल न्युज नेटवर्क च्या हाती आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (7 जून) रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. सहकारातून समृद्धीचं आपलं व्हिजन गाठण्यासाठी केंद्र सरकारनं सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. तशी घोषणाच आज केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचं वृत्त देण्यात आलंय.
सहकारातून समृद्धीचं आपलं व्हिजन साकार करण्यासाठी केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. हे मंत्रालय देशात सहकार क्षेत्राला मजबूत करण्यासाठी प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक पाया उपलब्ध करण्यासाठी काम करेल, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अवघ्या काही तासांवर असताना केंद्र सरकारकडून नव्या मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे. आता या मंत्रालयाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.