बाला उपक्रमांतर्गत शिराळ शाळेचा चेहरामोहरा बदलणार

22

🔸शाळेला दानशुरांच्या मदतीचा ओघ सुरू – मुख्याध्यापक संतोष दाणी

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

बीड(दि.11जुलै):/ जिल्ह्यात जि.प.च्या शाळांमध्ये बाला उपक्रमाची अंमलबजावणी सुरु असून या उपक्रमांतर्गत शालेय इमारती एक अध्यापन साहित्य म्हणून विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.यामध्ये आष्टी तालुक्यातील जामगांव व शिराळ या केंद्राची निवड झाली असून सर्व शाळा इमारतीची रंगरंगोटी करणे,झाडांना कठडे बांधणे,रॅम्प तयार करणे,विविध बोर्ड तयार करणे,जुन्या टायर पासून खेळणी तयार करणे,सुविचार लेखन,चित्रे काढणे,नकाशे काढणे,शालेय परिसरात वृक्षारोपण आदी कामे करावयाची आहेत.या मधून मुले शालेय परिसरात रममाण होऊन अध्यापन करणार आहेत.या उपक्रमाची या दोन्ही केंद्रात तयारी चालली असून गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,शिक्षणविस्तार अधिकारी धनंजय शिंदे,केंद्रप्रमुख त्रिंबक दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक काम करत आहेत.
या उपक्रमासाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसताना अंमलबजावणी करताना शिक्षकांची दमछाक होत आहे.परंतु वरिष्ठांच्या आदेशानुसार उपक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकानी स्वतः व समाजाच्या सहभागातून हे काम हाती घेतले आहे.शिराळ शाळेचे मुख्याध्यापक संतोष दाणी यांनी स्वतः ५ हजार रुपये खर्चून शिक्षकांच्या मदतीने रंगरंगोटी सुरु केली असून इतर कामासाठी दाणी यांनी समाजातील दानसूरांना मदतीचे आवाहन करताच डॉ.उमेश गांधी,डॉ.प्रमोद भळगट,नवीनशेठ कासवा,राम खाडे,भगीरथ धारक,संपत गाडे,दादा जगताप,प्रा.संभाजी झिंजुर्के यांनी शालेय विकासासाठी तात्काळ १५ हजार रुपयांची मदत केली असून उर्वरित कामे आ.बाळासाहेब आजबे,पं.स.सदस्य,शा.व्य.स.,सरपंच, ग्रामसेवक,शिक्षणप्रेमी नागरिक,पालक,ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पूर्ण करणार असल्याचे संतोष दाणी यांनी सांगितले.आणखीही शाळेला मदतीची गरज असून दानशूरांनी केलेल्या मदतीबद्दल शा.व्य.स.व शाळेतील शिक्षक श्रीमती मंगल झगडे,परमेश्वर जगताप,राजू ढवण,सतीश शिंदे यांनी आभार मानले आहेत.
————-
* गुणवत्तेबरोबर सामाजिक कार्याचा लळा असणारे संतोष दाणी

शाळेचे मुख्याध्यापक संतोष दाणी यांना शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्याचीही आवड असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा असून यापूर्वी त्यांनी विविध शाळेत समाजाच्या सहभागातून आतापर्यंत ८ ते १० लाख रुपये लोकवाटा जमा करून विविध कामे केली असून त्यांना सामाजिक कार्याचे राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय १५ ते २० पुरस्कार मिळालेले आहेत.एकच ध्यास गुणवत्ता विकास हे ध्येय ठेऊन ते काम करतात.गुणवत्ता विकास कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचा गुणवत्ता चषक देखील मिळवलेला आहे.बाला उपक्रम यशस्वीपणे राबविणार असल्याचे संतोष दाणी यांनी सांगितले.
.