दिवंगत मोतीरामजी मेश्राम स्म्रुती सार्वजनिक वाचनालय इमारतीचे लोकार्पण

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.16जुलै):- दिवंगत मोतीरामजी मेश्राम स्म्रुती सार्वजनिक वाचनालय टेकरी (इरव्हा ) ता. नागभीड जि. चंद्रपुर च्या इमारतीचे लोकार्पण मा.श्रिमती विमलताई मोतीरामजी मेश्राम (माजी सरपंच ग्राम पंचायत ढोरपा) यांचे हस्ते व श्री सुभाष मेश्राम (अध्यक्ष दि. मो. मे. सा. वा.टेकरी इरव्हा) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यात वाचनालयाचे सर्व पदाधिकारी व विद्यार्थी व गावकरी उपस्थितीत होते. प्रचंड उत्साहात कार्यक्रम पार पडला.

दिवंगत मोतीरामजी मेश्राम स्म्रुती सार्वजनिक वाचनालय टेकरी इरव्हा याचा फायदा ग्रामीण विद्यार्थी विद्यार्थीनीनी अभ्यासिकेचा उपयोग करुन त्यांचे भविष्य उज्जल करण्यासाठी करावा असे अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना श्री सुभाष मेश्राम यांनी केले.

या कार्यक्रमाचे संचालन श्री नामदेव रामटेके सचिव यांनी तर प्रास्तविक प्रा.भाष्कर मेश्राम यांनी संस्थेच्या स्थापना २००६ पासुन २०२१पर्यंतचा संपुर्ण चढ उताराचा प्रवास उपस्थितासमोर मांडला. संस्थेने ग्रामीण भागात विद्यार्थी विद्यार्थीनीना कोरोना काळात सुध्दा मदत करुन कोरोना नियम पाळुन ज्ञानाचा झरा निरंतर वाहत ठेवला .

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सदस्या प्रफुल्लता गेडाम, सौ.जयशिला मेश्राम, सौ. सुनिता मेश्राम, श्री राजेंद्र बागडे , श्री रमेश मेश्राम सर , जेम्स सर ,उपसरपंच श्री राकेश रामटेके ,श्री कार्तीक शेंडे , श्री संजय बोरकर श्री विनोद मेश्राम ग्रंथपाल विजय मेश्राम यांनी परिश्रम केले. सर्वही उपस्थिताचे आभार श्री विजय मेश्राम ग्रंथपाल यांनी मानले.