आष्टीतील वसुंधरा शाळेतील १५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुणांसह १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

60

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.18जुलै):- येथील वसुंधरा प्राथमिक विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून १५ विद्यार्थ्यांना १०० टक्के,२ विद्यार्थ्यांना ९९.८० टक्के,२ विद्यार्थ्यांना ९९.४० टक्के तर उर्वरित ४६ विद्यार्थ्यांना ९९ ते ९३ टक्के च्या दरम्यान गुण मिळालेले आहेत.या वर्षीही वसुंधरा विद्यालयाने आपल्या १०० टक्के निकालाची यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.सीमा बोंदार्डे यांनी दिली.वसुंधरा विद्यालयातील ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदणी केलेली होती.त्यापैकी सर्वच विद्यार्थी हे १०० टक्के ते ९३ टक्के च्यादरम्यान गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत.{अ

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शुभम आप्पासाहेब काळे,अरहान जावेद इनामदार,क्रूष्णा नारायण तरटे,वैष्णवी बापू शिंदे,ओमकार aq शिंदे,शिवतेज सतिश पोले,गीतांजली परमेश्वर कर्डिले,किर्ती शिवाजी जाधव,प्रगती बाळासाहेब कसबे,श्रावणी संजय दहिवळ,शुभांगी संपत शेळके,सृष्टी शहादेव पिंपळे,वैष्णवी गोविंद सोले,यशांजली शिवाजी राऊत,प्रगती विकास देसाई,अंकिता प्रवीण धस,स्नेहा महेश्वर वर्धमाने या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

वसुंधरा विद्यालयातील सर्वच ६६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.औरंगाबाद विभागाचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे.कोरोनामुळे यावर्षी ही जाहिर झालेल्या दहावीच्या परीक्षा रद्द झालेली होती.अंतर्गत मूल्यमापन कार्यपद्धतीतील तरतुदीनुसार नववीचा अंतिम निकाल,दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन,दहावीचे अंतिम तोंडी आणि प्रात्यक्षिक तसेच अंतर्गत मूल्यमापन आदींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले.ते गुण विचारात घेऊन मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
मंडळामार्फत विशेष मार्गदर्शक सूचना विद्यालयांना दिल्या होत्या.त्यानुसार शाळा स्तरावर कार्यवाही झाली.वसुंधरा विद्यालयातील वरील गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष मनोज धस यांनी फोनवरून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.सिमा बोंदार्डे,माध्यमिकचे मुख्याध्यापक मंगेश भालेराव,दादासाहेब लांडगे,गोरख नाईक,सतीश पोले,चव्हाण,भागवत,जगताप ,यांनी वर्षभर दहावीतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करून अभ्यासक्रम पुर्ण करून सर्व विद्यार्थ्यांचा नियमित सराव करून घेण्यात आला होता.शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्यामुळे वसुंधरा विद्यालयाचे सर्व शिक्षकांचे व विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आ.सुरेश आण्णा धस यांनी फोनवरून अभिनंदन केले आहे अशी माहिती शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भालेराव सर यांनी दिली.