आधार नागरी सहकारी पतसंस्थेचा चिमुर क्रांतीनगरीत थाटात शुभारंभ

30

✒️सुयोग सुरेश डांगे(विषेश प्रतिनिधी)

चिमूर(दि.19जुलै):-आधार नागरी सहकारी पतसंस्था चिमुर रजी. न.816 चा उद्घाटन सोहळा संस्थेचे कार्यालय हनुमान मंदिर जवळील कांपा रोड वडाळा पैकू चिमुर येथे पार पडला.बचत गटाच्या माध्यमातून सहकारी पतसंस्थेची निर्मिती करण्याचे नाविन्यपूर्ण कार्य प्रथमच युवा संचालकांनी केले.

आधुनिक सुविधायुक्त संगणकीय व्यवहार प्रणाली, आकर्षक व्याजदर, सर्व प्रकारच्या कर्जसुविधा उपलब्ध, उच्चशिक्षित कर्मचारी युवा तज्ज्ञ संचालक मंडळ, वातानुकूलित कार्यालय इ. वैशिष्ट्यपूर्ण पतसंस्थेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री मा.रमेशकुमार गजभे , श्रीमती पुष्पताई शेरकुरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

पतसंस्थेच्या माध्यमातून समाजाच्या आर्थिक उन्नतीत हातभार लावण्याचे कार्य करणार असल्याचे अध्यक्ष गुणवंत वाघमारे यांनी मत व्यक्त केले. जगदीश झोडे ,प्राजक्ता वाघमारे लोणारे आदींनी मुदत ठेव,बचत ठेव ठेवून श्रीगणेशा केला. संस्थेला सहकार्य केल्याबद्दल केवळभाऊ वाघमारे यांचा सत्कार केला.

या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित अरविंदभाऊ सांदेकर, ऍड अविनाश अगडे , व्यापारी मंडळ अध्यक्ष श्री प्रवीण सातपुते, धनंजय दडमल, विजय घरत, संजु शेरकर, रामचंद्र श्रीरामे , विश्वनाथ वाकडे, संदीप धारणे, केशव गजभे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सरोज चौधरी, प्रास्ताविक ओमेश जांभुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. शरयू शेरकुरे यांनी केले.