सुर्डी बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्या- लोकतांत्रिक जनता दल

28

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.20जुलै):- माजलगांव तालुक्यातील सुर्डी येथे नऊ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व पोलिसान्नी आरोपीला फाशी होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी लोकतांत्रिक जनता दल च्या वतीने मा.जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.सदरील प्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशन माजलगांव येथे दि . 13 / 07 / 2021 रोजी FIR क्रमांक 0176/2021 मध्ये आरोपी पुरुषोत्तम श्रीराम घाटुळ रा.सुरडी नजीक ता.माजलगांव जि.बीड च्या विरोधात भादवी कलम 376 ( M ) व बालकाचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनीयम 2012 चे कलम 4,5 ( M ) , 6 , 10 , नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडीत अल्पवयीन मुलगी ही वय 9 वर्षाची असुन नराधम आरोपीच्या अत्याचारामुळे गंभीर दुखापत झाली व अती रक्त स्त्रावामुळे शासकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आली होती. तीची परिस्थीती गंभीर आहे. तरी सदरहु गुन्ह्यातील आरोपीला मा.न्यायालया समक्ष हजर करून पी.सी.आर मागुन सखोल चौकशी करण्याची गरज असतांना तपास अधिकारी यांनी पी.सी.आर ची मागणीच केली नाही व सरळ सरळ आरोपीला जामीनासाठी मोकळा रस्ता करुन दिला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनची भूमिका संषयास्पद असल्याचे दिसुन येते. सदरहु प्रकरणातील तपास अधिकारी याची सखोल चौकशी करुन योग्यती कार्यवाही करुन दंडीत व निलंबीत करण्यात यावे.

आरोपीस कायम निकाल लागेपर्यंत मा.न्यायालयाच्या कोठडीत ठेवून जलद गती कोर्टात प्रकरण चालवण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती कारवाई करावी, सदर प्रकरणाचा तपास इतर योग्य त्या सक्षम अधिकाऱ्याला देवून प्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा. आरोपी हा पीडीताच्या विरुध जातीचा असल्यामुळे व पीडीता ही अल्पसंख्याक समाजातुन असल्यामुळे आरोपी जर जामीनावर सुटुन आल्यास तपास कामात अडथडा निर्माण करु शकतो व गावात व परीसरात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री यांनी गुन्हयाची गंभीरता लक्षात घेवून या प्रकरणाची तात्काळ दखल घेवुन पीडीतेस न्याय द्यावा.अशी मागणी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी लोकतांत्रिक जनता दल चे जिल्हाध्यक्ष पठाण अमरजान, शेख वसीम, शेख चांद, शेख सलमान सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.