महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी गणेशराव जगताप यांची नियुक्ती

26

✒️विषेश प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)संपर्क:-९९६०७४८६८२

नायगांव(दि.21जुलै):- अखिल भारतीय धोबी महासमाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे यांच्या उपस्थितित व जेष्ठ चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत गाडगे बाबा आश्रम शाळा, पांडुर्णा, ता मुदखेड जि. नांदेड येथे महाराष्ट्र राज्य परिट-धोबी सेवा मंडळ राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली.
बैठकीत सर्व प्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमाचे पुजन व गेल्या वर्षेभरा पासुन कोरोना काळात समाजातील लहान थोर समाज बाधवाचे निधन झाले त्यां सर्वाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रदेश अध्यक्ष विवेकभाऊ ठाकरे यांच्या अनुपस्थितीत संघटनेचे कार्य पुढे सुरळीत चालण्याच्या हेतुने सर्वांच्या संमतीने संघटनेच्या प्रभारी प्रदेश अध्यक्ष पदी गणेशभाऊ जगताप व प्रदेश कार्याध्यक्ष पदी संजयभाऊ भिलकर व प्रदेश उपअध्यक्ष पदी मा श्री संताजी शिंदे साहेब यांची नियुक्ति करण्यात आली.
बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी समाजातील ज्येष्ठ मंडळी माननीय रा.ह.चांदुरकुर, अशोक राजा चुके कर, मनीष वानखेडे, विजय देसाई, कचरूजी पाचगिरे, सुनिलभाऊ लोणवडे, गंगाधरराव मावलेसर, गोविंद माचनवाड, बालाजी इबितदार, राजेंद्र सोनवणे, रामनाथ बोरूडे, शंकरराव बनसोडे, कैलास भाऊ तेलंग टेभूर्णीकर, गणपतराव तेलंग, रमेश घोडके, विलास जाधव, ज्ञानेश्वर कदम, प्रमोद चांदुरकर, सुभाष शिंदे, कैलास निकम, दत्ता सिल्लेवाड, गोपी चाकर, पालकर मॅडम, साईनाथ हजारे, संतोष शिंदे, बन्सीलाल कदम, गंगाधर निमलवार, सुधीरराव जाधव, सर्जेराव भागवत, सर्वेश कुमार रजक, गोपीअण्णा चाकर, उल्लासराव मोकळकर, बाळासाहेब मोकळकर, कृष्णादास चांदुरकर, शाम डंबेलकर, अमोल डंबेलकर, बाळुदादा ईकळीकर, दत्ता भाऊ येवले, भानुदासराव येवले, माधवराव नाईके, दिगंबरराव दावबे, बाबुराव हाळदेकर, मारोती ढाकणीकर,राजेश विभुते, गंगाधर त्रिमकदार, गणेश आरलवाड, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.