आम्हां कीर्तनकार आणि आपल्या सर्वाचे काहीतरी चुकले म्हणुनच कोरोनासारखे महाभयंकर संकट – ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल

23

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.21जुलै):-रडण्याने भक्तीची सुरुवात होते आणि आपल्यासाठी देवाच्या रडण्याने भक्तीचा शेवट होतो.चर्मदृष्टीची भक्ती,प्रेमातुन केलेली (भावनिकदृष्टीची)भक्ती आणि ज्ञानयुक्त दृष्टीची भक्ती हे भक्तीचे तीन प्रकार आहेत.नेहमी जशी दृष्टी तशी सृष्टी असते.शब्दाने,अनुमानाने,परोक्षिताने आणि अपरोक्षीज्ञानाने देव जाणता येतो.संत तुकाराम महाराजाने देव जसा आहे तसा जाणला.त्याच्याशी ऐक्यभाव साधला आणि भक्ती केली.अनुभुती घेतली.आनंद कुठुनही कसाही मिळु द्या परंतु तो देवापासुनच आनंद मिळतो.आनंदस्वरुप परमात्मा आहे.वासना निवृत असणा-याला लाखो पटीने आनंद मिळतो.विषयात सुख नाही ते मृगजळासारखे आहे.

जीवन संपते तरीही सुख मिळत नाही.जीव जेव्हा परमात्म्यात विलीन होईल तेव्हाच त्याला आनंद प्राप्त होईल.
कोरोना महामारीबाबत बोलताना ते म्हणाले की,आम्हां कीर्तनकार आणि आपल्या सर्वाचे काहीतरी चुकले म्हणुनच कोरोनासारखे महाभयंकर संकट आल्याचे प्रतिपादन ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी केले.आष्टी तालुक्यातील कडा येथील संतनगरात असलेल्या संत मदन महाराज देवस्थान आवारात आषाठी एकादशी निमित्तनिमित्त आयोजित हरिकीर्तन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी हनुमानशेठ बिहाणी,हेमंत बियाणी,भीमराव पाटील,दादा महाराज चांगुणे,संतोष महाराज मोरे,सुभाष महाराज सोनवणे,विश्वनाथ चांगुणे,राम ससाणे,चंद्रकांत ससाणे,आण्णासाहेब बोरसे मुकादम,पांडुतात्या झिंजुर्के,माजी सभापती संजयनाना ढोबळे,राजाबापू कर्डीले,गोरख कर्डीले,बंडु शिंदे,हरिभाऊ मार्कर्डे,वसंत मोरे नाना,सर्जेराव खोटे,पांडुरंग कर्डीले,पत्रकार उत्तम बोडखे,राजेंद्र तांंगडे,बाळासाहेब पवळ,सोमीनाथ आप्रे,प्रल्हाद पाचे,सुभाष महाराज बोरुडे,सुभाष घावटे,शिवाजी महाराज एकशिंगे,नेहरु मुटकुळे,संतोष भंडारी,सुनिल देशमुख ,अनिकेत चांगुणे,महेश बहिरवाल,कृष्णा बहिरवाल आदि मान्यवर उपस्थित होते.शुक्रवारी गुरुपोर्मेनिमित्त प्रसादाची पंगत माजी सभापती संजयनाना ढोबळे यांची आहे.यावेळी होणाऱ्या हरिकीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प.बबन महाराज यांनी यावेळी केले.