रुग्ण हक्क परिषद सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने महिलांना व्यवसाय प्रशिक्षण शिबीर संपन्न

21

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

सांगोला(दि.21जुलै):-रुग्ण हक्क परिषद ही रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी जगातील पहिली संघटना संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी निर्माण केली. रुग्ण हक्क परिषदेच्या स्थापनेपासूनच नागरिकांमध्ये रुग्णांचे न्याय आणि हक्क याबाबतची जनजागृती करणे आणि शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविणे यासाठी रुग्ण हक्क परिषद नेहमीच अग्रेसर कामगिरी केली आहे.

आर्थिकदृष्ट्या गरीब दुर्बल नागरिकांना औषधोपचारासाठी शासनाच्या विविध योजना आणि कायदे – अधिनियम अस्तित्वात असताना देखील अनेक नागरिकांना उपचाराअभावी मरणाला सामोरे जावे लागत होते, त्या अनुषंगाने शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविल्या पाहिजेत त्यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने महिला आणि असंघटित कामगारांचे आरोग्य सर्वेक्षण करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.

संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या कामाचा एक भाग म्हणूनच सर्वेक्षण कार्यक्रम संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी आज महिलांचे व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा सरचिटणीस बाबा चोबे यांनी दिली.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये सांगोला पंचायत समिमिती सभापती सौ. राणीताई काळोखे, कल्पना पवार, श्रीनिवास गंगणे गोविंद विभुते, मनिषा बंडगर प्रमुख उपस्थित होते.