मोटर सायकल सवाऱ्यांना कुरळी गावातील तरुणांची मदतीचा हात

57

✒️सिध्दार्थ दिवेकर तालुका प्रतिनिधी उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड- तालुक्यातील ढाणकी ते किनवट मार्गावर असलेले छोटेसे कुरळी गावातील तरुणांने ढाणकी ते किनवट मार्गावर असलेल्या पुलावर पाण्याचा पुर आल्यामुळे नागरिकांना ये – जा करण्यास अडचण निर्माण झाली होती.

पण कुरळी गावातील तरुणांनी ये जा करणाऱ्या मोटार सायकल सवारांना व सोबतच्या व्यक्तीला पुलावरील पुराच्या पाण्यातुन हाताला हात धरून पूल पार करण्यास मदत केली.

तरुणांसी विचारणा केली असता ते म्हणाले की, आम्ही दर वर्षी ये जा करणाऱ्या नागरिकांना अशा प्रकारे निस्वार्थपणे मदत करत असतो.या बद्दल तरुणांचे नागरिकांकडून त्याची कौतुक केली जात आहे.