गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसंपर्क अभियानांला गाव,वाडी, वस्ती,तांड्यावर उत्तम प्रतिसाद

32

🔹जुन्या-नव्या शिवसैनिकांची बांधली मजबूत मोट

✒️गेवराई प्रतिनिधी(देवराज कोळे)

गेवराई(दि.23जुलै):-शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर राबविण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत गाव, वाडी, वस्ती, व तांडावर जाऊन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी अक्षरशः गेवराई मतदारसंघ पिंजून काढला आहे. ग्रामस्थांसह जुन्या आणि नव्या शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांनी शिवसेनेची मजबूत मोट बांधल्याचे दिसत आहे.
बीड जिल्ह्यात आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मजबूत मोट बांधण्यासाठी दिनांक 19 जुलै ते 22 जुलै दरम्यान शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी शिवसंपर्क अभियान अंतर्गत गाव, वाडी, वस्ती व तांड्यावर जात अक्षरशः मतदारसंघ पिंजून काढला आहे.

विशेषतः बदामराव पंडित यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीताताई चव्हाण, अंगणवाडी सेनेच्या जिल्हा संघटक उज्वलाताई भोपळे, युवा सेना जिल्हाप्रमुख सागर बहिर या जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांसह माजी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, माजी सभापती पंढरीनाथ लगड, माजी पं स सभापती अभयसिंह पंडित, युवानेते रोहित पंडित, युवानेते यशराज पंडित, उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, बबलू खराडे, तालुकाप्रमुख कालिदास नवले, किसान सेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ, युवा सेना तालुका अधिकारी साहिल देशमुख, माजी तालुकाप्रमुख अजय दाभाडे, आरोग्य मदत कक्ष तालुका समन्वयक धर्मराज आहेर, शेख सिराज, माजी सभापती गीताराम डोंगरे, शेख रफिक,देवराज कोळे या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मतदारसंघातील मादळमोही, कोळगाव, आंतरवाली, तलवाडा, रोहितळ, केकतपांगरी, जातेगाव, लुखामसला, बागपिंपळगाव, उमापूर, पाडळसिंगी, पाचेगाव, शिरसदेवी, गढी, तळेगाव, धोंडराई, रुई, लोणाळा फाटा, यासह तालखेड, टाकरवन, कामखेडा आदी सर्कल व गावात जाऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षात कोरोनाची स्थिती गंभीर असतानाही केलेल्या विविध विकास कामांबाबत माहिती देऊन, शेतकऱ्यांना झालेली कर्जमाफी, आरोग्यविषयक निर्माण केलेल्या सुविधा आणि शेतकरी व सामान्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे योग्य निर्णय घेत असल्याने त्यांची वाढत चाललेली लोकप्रियता याबाबत माहिती देऊन, बदामराव पंडित यांनी गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्याला प्राधान्य देण्याचा संकल्प केला.

येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समितीसह ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी आजच कामाला लागावे असे आदेश दिले. एकंदरीत बदामराव पंडित यांनी मतदारसंघात राबवलेल्या शिवसंपर्क अभियानाला ठिकाणी ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सत्तेच्या कोणत्याही पदावर नसताना जनसामान्यात निर्माण केलेला विश्वास हा बदामरावांसाठी जमेची बाजू ठरत आहे. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी सवाद्य मिरवणूक काढून जाहीर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ठीकठिकाणी झालेल्या या कार्यक्रमास शाखाप्रमुखापासून सर्कल प्रमुख, प्रसिद्धीप्रमुख यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिवसंपर्क अभियानचा येणाऱ्या काळात शिवसेनेला निवडणुकीसाठी चांगला फायदा होईल हे नक्की.