दलित पँथरचे अन्याय अत्याचारा विरोधात मुबंईत महामोर्चाचे आयोजन

26

🔸चैत्यभुमी ते मंत्रालय पायी महामोर्चा – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डाॅ घनःशाम भोसले

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.२८जुलै): – महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनुसूचित जाती चे सर्वच प्रश्न प्रलंबित असुन महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर याबाबतीत योग्य निर्णय घ्यावा. कोरोणाच्या महामारीमुळे महाराष्ट्र शासनाने शाळा बंद ठेवून शालेय विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधारात ठेवून शिक्षणाचा फज्जा उडवला असून UPSC- MPSC पोलिस भरती, नीट परिक्षा सारख्या परिक्षा पुढे ढकल्या असून ही बाब संविधनाच्या हिताची नसून खुप गंभीर बाब असल्याचे दलित पँथर सामाजिक संघटनेच्या ध्यानात आली असून १६ ऑगस्ट ला चैत्यभुमी ते मंत्रालय महामोर्चाचे आयोजन दलित पँथर च्या वतीने करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांनी निवेदनात केले आहे.

त्यातील प्रमुख मागण्या १)अनुसूचित जाती च्या SC च्या पदोन्नतीचे मिळालेच पाहिजे.2)अनुसूचित जाती च्या ३१२ आश्रमशाळाना ८ मार्च २०१९ च्या धोरणाप्रमाणे १६५ शाळेला अनुदान मिळाले पण राहिलेला १२३ शाळांनाही अनुदान मिळायलाच पाहीजे.
३)अनुसूचित जातीच्या आश्रमशाळेना प्रलंबित प्रस्तावाला मान्यता मिळालीच पाहिजे.
४) स्वयंसेवी संस्थेने खाजगी वस्तीग्रह चालवली जात आहेत त्या वस्तीग्रहातील कर्मचारी यांना मानधना एवजी वेतन मिळालेच पाहिजे.
५) विज बिल माफ,(पेट्रोल- डिझेल, गॅस,तेल ) महागाई थांबवावी व शेतकर्याचे कर्ज माफ झालेच पाहिजे तसेच शेतकर्याच्या मालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे.
६) विद्यार्थ्यांची स्काॅलरशिप मिळाली पाहिजे.
७) अण्णाभाऊ साठे महामंडळ , महात्मा फुले महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, अण्णा पाटिल महामंडळ यांची कर्ज माफ झालि पाहिजे तसेच सर्व महामंडळाचे तत्काळ कर्ज चालू केली पाहिजे.
८) मराठा तसेच धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे तसेच OBC समाजाला राजकिय आरक्षण मिळालेच पाहिजे
९) अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळायलाच पाहीजे.
१०) सहकार उद्योग अनुसूचित जातीसाठी (१० कोटींचे प्रकार) सुरू झालेच पाहिजे.
११) अंगणवाडी सेवकांना मानधनाएवजी वेतन तसेच आशा वर्कराना २५हजार रूपये मानधन मिळायलाच पाहीजे.
१२) सुशिक्षित बेरोजगारांना मानधन १५ हजार रूपये भत्ता मिळायलाच पाहिजे.
१३) दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेत ज्या जाचक अटीशर्थी लावल्या आहेत त्या अटी रद्द केल्या पाहिजेत तसेच शेतकर्याना १००% अनुदान मिळायला पाहिजे.
या प्रमुख मागण्या घेऊन दलित पँथर चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्त्यावर उतरून महाविकास आघाडीला वेठीस धरणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांनी यावेळी सांगितले.

राज्यामध्ये कायद्याचा धाक राहिला नसून अन्याय अत्याचार वाढत व धर्मातु झुंड शाहीने दादागिरी करून मागासवर्गीय महिलावरती तसेच मागासवर्गीय यावरती जावून हल्ले करत आहे याचे उदाहरण म्हणजे संजय गायकवाड सारख्या आमदारांने जे बेताल वक्तव्य केले ते मागासवर्गीयांच्या विरोधात असून संविधानाला तसेच कायद्याला न शोभणारे आहे म्हणून दलित पँथर सजंय गायकवाड यांचा जाहिर निषेध करते. अट्राॅसिटी चा गुन्हा दाखल केला तर तुम्ही त्यांच्यावरती दरोडेचे गुन्हे दाखल करा.मि पाहतो काय ते त्यानतंर तुम्ही गावागावामध्ये जाऊन फौज तयार करा व या मागासवर्गीयावर तुटून पडा मि १०हजार ची फौज घेऊन येतो असे बेताल वक्तव्य करणार्या संजय गायकवाड याची आमदारकी रद्दच झाली पाहीजे अशी दलित पँथर ची प्रमुख मागणी आहे . त्याचप्रमाणे हर्षवर्धन जाधव नावाच्या माजी आमदारांने डिलिट झालेले कार्ड पुन्हा एकदा नव्याने रिचार्ज होण्यासाठी स्वतः ची प्रसिद्ध कशी होईल यासाठी या विकृत अवलादीने जतंरमंतर वरती घटना बदलण्यासाठी मि दिल्ली मध्ये आंदोलन करणार आहे अशी भाषा वापरून समाजामध्ये तेढ निर्माण करणे आहे.

याचा विचार म्हणजे स्वतःची प्रसिद्धी करून घेणे असा असून उठसुट डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान आणि मागासवर्गीय यांना टारगेट करणे असा असून अशा विकृती हर्षवर्धन जाधव याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी दलित पँथरच्या वतीने करण्यात येत आहे.गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये ०२ दिवसाचे अधिवेशन महाविकास आघाडीने घेतले त्यावेळी जनतेच्या पैशावरती करोडो रूपायचा चुरडा करून हे अधिवेशन घेण्यात आले ते अधिवेशन कशासाठी होते तर जनतेच्या हितासाठी परंतु हे अधिवेशन संसदेमध्ये सुरू होताच १२ आमदारांनी जो गदारोह केला.

संसदेतील सभापती याना अश्लील शिविगाळ केल्या ही गंभीर बाब असुन येथे ही लोकशाहीचा अपमान केला म्हणून दलित पँथर त्या १२ आमदारांचा जाहिर निषेध करते. तसेच ससंदेमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी OBC च्या प्रश्नावरती बोलायला सुरवात केली असता त्यांनी अध्यक्षांच्या अंगावरती धावणे शिविगाळ करणे म्हणजे याना OBC याना आरक्षण द्यायचे नाही असे दिसून येते कारण जे महत्वाचे मुद्दे पाहिजे होते त्या मुद्यामध्ये स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्यांनी UPSC – MPSC परिक्षा पास होऊन सुद्धा अधिकारी बनता आले नाही याचे कारण महाविकास आघाडीच्या भरतीचा दिरंगाई पणा यामध्ये सुध्दा दलित पँथर विरोध करत आहे.

विरोधी पक्षाने जे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सर्वसामान्य गरिब जनतेच्या हिताचे तसेच शेतकर्याच्या हिताचे प्रश्न, मागासवर्गीय यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मांडणी करायला पाहिजे होती. ती केली नसून केवळ वेळकाढूपणा केलेला आहे व लाखो करोडो रूपयाचा चक्काचूर केलेला आहे.
यांना सर्वसामान्य जनतेचे काहीच पडले नाही फक्त एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करायचे केंद्राने राज्याकडे व राज्याने केंद्राकडे बोट दाखवायचे हे राज्य सरकार व केंद्र सरकार जनतेची फसवणूक करीत आहे म्हणून दलित पँथर ही संघटना सर्व सामान्यांचा आवाज जागृत करण्यासाठी व सर्व जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांच्या नेतृत्वाखाली या प्रमुख मागण्या घेऊन दलित पँथर ही सघंटना रस्त्यावर उतरून या देशाची व महाराष्ट्रची पार्लमेन्ट रस्त्यावरच आहे ती म्हणजे सर्वसामान्य जनता हे आता सांगायची वेळ आली आहे.

कारण १२ आमदारांनी संसदेत केलेला गदारोळ , सजंय गायकवाड, हर्षवर्धन जाधव अशा विकृतीच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी दलित पँथर सज्ज झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ, राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र सोनवणे, केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जगदिश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महाराष्ट्र भर लक्षवेधी करण्यासाठी दलित पँथर चैत्यभुमी ते मंत्रालय पायी मोर्चा काढणार आहे तरी सर्व सामान्य जनतेने मोर्चात सहभागी होऊन प्रतिसाद देण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांनी केले आहे.

उठ दलिता जागा हो, दलित पँथर चा धागा हो, माझ्या पोटात पडते आग, उठ दलिता तोफा दाग