आष्टी तालुक्यातही मिळणार कोरोनाची खाजगी लस

43

🔹कड्याच्या सुरभी हाॅस्पीटलमध्ये बुधवार,शनिवार लस उपलब्ध

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.30जुलै):-कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका असल्याचे तज्ञांचे मत असून,यावर मात करण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे.सध्या ग्रामिण रूग्णालयात वेळेवर लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेकांना आल्या पावली लस न घेताच परत जावे लागत आहे.आता आष्टी तालुक्यातील कडा शहरातही खाजगी असलेले सुरभी हाॅस्पीटल मध्ये पैसे भरून लस मिळणार असल्याचे सुरभी हाॅस्पीटलच्या वतीने सांगण्यात आले आहे.

    अहमदनगर येथील सुरभी हाॅस्पीटल प्रा.लि.च्या वतीने १८ वर्षाच्या पुढील सर्व व्यक्तींना लस देण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे.अजूनही कोरोनाचे संकट गेलेले नसून,दिवसेंदिवस आष्टी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे.आता यावर मात करण्यासाठी लस घेणे गरजेचे असून,लसही ग्रामिण रूग्णालयात पुरेशी येत नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडत असतो.यामध्ये नागरीक व डाॅक्टरांमध्येच वाद-विवाद होत असल्याचे दिसून येत आहे.बरेच जण गर्दीत जाणे टाळत असल्याने लसीपासून ते वंचीत आहेत.

यावर शासनाने अधिकृत अहमदनगर येथील सुरभी हाॅस्पीटलला आष्टी तालुक्यातील कडा शहरात असलेल्या सुरभी हाॅस्पीटलच्या शाखेत खाजगी लस उपलब्ध करण्यात आली आहे.ही लस घेण्यासाठी अधिकृत वेबसाइडवर जाऊन नोंदणी करून आधार कार्ड बरोबर घेऊन दिलेल्या वेळेत हाॅस्पीटलमध्ये लस घ्यावयाची आहे.त्यासाठी शासनाने ठरवून दिलेले दर मात्र आपल्याला मोजावे लागणार आहेत.
——————–
बुधवार आणि शनिवारी मिळणार लस 
सुरभी हाॅस्पीटलच्या वतीने अहमदनगर येथे दररोज आणि आष्टी तालुक्यातील कडा शहरात दर बुधवार आणि शनिवारी लस उपलब्ध राहणार आहे.ज्या नागरीकांना लस घ्यायची आहे.त्यांनी नोंदणी करून सोबत ओळखपञ आणून लस घ्यावी.
डाॅ.राकेश गांधी,संचालक सुरभी हाॅस्पीटल प्रा.लि.