मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयासाठी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाकडे अत्याधुनिक साहित्याची मागणी – आ.बाळासाहेब आजबे

31

🔹बीड जिल्ह्यातील बॉर्डरवर अँटिजेन टेस्टिंग करून मगच जिल्ह्यात प्रवेश

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.31जुलै):-कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असुन शिरूर येथे ५० ऑक्सिजन बेड,पाटोदा,आष्टी येथे प्रत्येकी दहा व्हेंटिलेटर बेड,प्रत्येक तालुक्यासाठी १० बायपॅप,आष्टी येथे सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करून द्यावी तसेच लहान मुलांसाठी अद्यावत सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार बाळासाहेब आजबे यांनी पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे व जिल्हा प्रशासनाकडे बीड येथे झालेल्या बैठकीत केली आहे.
आगोदरचा ऑक्सिजन प्लांट येत्या १५ ऑगस्ट पर्यंत कार्यान्वीत होणार असून आष्टी येथील ट्रामा केअर सेंटर येथे दुसरा ७५ लाख रूपायांचा ऑक्सिजन प्लॅट चे काम सुरू होणार असल्याचे प्रतिपादन आ.बाळासाहेब आजबे यांनी केले.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात दि.३० रोजी पालकमंञी ना.धनजंय मुंडे यांच्या अध्यक्षेतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी या बैठकीत आ.बाळासाहेब आजबे यांनी शिरूर तालुक्यात ५० आँक्सिजन बेड तसेच आष्टी,पाटोदा व शिरूर तालुक्यात प्रत्येकी बायपॅप मशीन – १०,व्हेटींलिटर – १० द्यावेत तसेच आष्टी शहरातील ट्रामाकेअर येथे सुरू असलेले आँक्सिजन प्लंटचे काम प्रगती पथावर सुरू असून,येत्या १५ आँगस्ट पर्यंत हे काम पुर्ण होणार आहे.

तसेच आ. बाळासाहेब आजबे यांच्या मागणीनुसार पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांनी पुन्हा आष्टीसाठी तेरा केएल ऑक्सिजन प्लॅट ला ७५ लाखाचा निधी मिळवून दिला आहे,याचे कामही लवकर सुरू होणार असून,हे दोन प्लॅट सुरू झाल्यास आष्टी,पाटोदा व शिरूर तालुक्यात आँक्सिजन कमी पडणार नसल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगीतले.