10 वि च्या गुणपत्रिका मिळणार?? या तारखांना?

27

✒️गडचिरोली,जिल्हा प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.31जुलै):-राज्यातील इयत्ता 10 वी पास विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका येत्या 9 आगस्ट पासून वितरित केल्या जाणार आहेत. यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळीच्या वतीने आजच एक पत्र विभागिय मंडळाला पाठविले आहे. त्यानुसार 9 आगष्ट रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर ही गुणपत्रिका विद्यार्थ्यांना दिली जातील.यंदा राज्यात कोरोनामुळे इयत्ता 10 वी च्या परीक्षा झालेल्या नाहीत. नुकताच निकष लावून परीक्षा मंडळाच्या वतीने निकाल जाहीर केला आहे. तसेच cet परीक्षा आगष्ट अखेर घेऊन 11 वीचे प्रवेश सुरू केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आपल्या 10 वी च्या गुणपत्रिका कधी मिळतात याची प्रतीक्षा होती.

“आजच्या परीक्षा मंडळाने येत्या 7 आणि 9 अगस्ट रोजी शाळांना गुणपत्रिका वितरित केली जातील आणि 9 आगष्ट च्या दुपारी 3 वाजल्यानंतर ती विद्यार्थ्यांना वितरित करावीत असा आदेश काढला आहे. ह्या गुणपत्रे घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मर्यादित कालावधी देऊ नये,जेणेकरून गर्दी होणार नाही.”
कोविड नियम पाडून पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनं शाळात येऊन गुणपत्रिका घेऊन जाता याव्यात यासाठी शाळांनी व्यवस्था करावी अशा सूचना केल्या आहेत.त्यानुसार येत्या 9 अगस्टच्या दुपारी 3 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.