माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी खोरी तांडा येथील पवार कुटुंबीयाच्या घरी भेट देऊन केले सांत्वन

23

🔹जातेगाव येथे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत संवाद साधला

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.1ऑगस्ट):- तालुक्यातील जातेगाव येथे माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांनी शेतकरी व गावकरी व शिवसेना कार्यकर्त्यांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, व खोरी तांडा येथील आरोग्य विस्तार अधिकारी मानिक पवार व आरोग्य सेवक वसंत पवार यांचे वडील भोटु पवार यांचे दुखत निधन झाल्याने पवार कुटुंबीयांची भेट घेऊन संत्वन केले.

व तसेच जातेगाव येथे शेतकरी व शिवसेना कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधला यावेळी सरपंच धनेश्वर खेत्रे , शिवसेना तालुका संघटक भागवत आबा आरबाड, विलास शिंदे, देवराज कोळे, अमोल धोडरे ,अदी उपस्थित होते.