हरवलेली दुदैवी रुपाली पाटील अखेर सापडली शहरातच !पण …. मृतावस्थेत!

76

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

धुळे(दि.1ऑगस्ट):- रुपाली बळवंत पाटील, वय 33 वर्ष, रा. ठी. A/305, श्रीजी विहार, लोढा गार्डन जवळ, कल्याण प., या दिनांक 27/07/21 रोजी दुपार पासून कल्याण बाजारात खरेदीसाठी गेली होती मात्र ती परत आलीच नाही म्हणून तिचा त्या दिवसापासून शोध सूरू होता.

दुसऱ्या दिवशी रुपाली 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान धुळे येथील एका वृद्धाश्रमात आली होती. व तिला काही रिक्षा चालकांनी देखील पहिली होती. असा संदेश मिळाल्याने तळई तालुका एरंडोल येथील जवळपास 50 जण धुळ्यात तिच्या शोध घेत होते . मात्र वृद्धाश्रमच्या लोकेशन नंतर तिचे लोकेशनच मिळत नव्हते. कुठलाही धागादोरा मिळत नव्हता. पण रूपली धुळ्यात आली होती वृद्धाश्रमातल्या लोकांनी देखील फोटो पाहून ठाम पने हिच महीला येथे 28 तारखेला आली होती असे सांगितल्याने रूपाली याच परिसरात असावी असा अंदाज शोध मोहिमेवर आसलेल्या सर्वांना होता.

अखेर आज दूफारी धुळ्यापासून जवळच नकाने शिवारात रूपाली मृत अवस्थेत आढळून आल्याने सर्वांना धक्काच बसला.
नेमकी ती कल्याण येथून धुळ्याला पोहचली कशी? तेथे वृद्धाश्रमात का गेली? हा घातपात आहे की अजून काही? मृत घटनास्थळ पर्यंतचा तिचा प्रवास या साऱ्या गोष्टी आता तपासाचा भाग आहेत. धक्कादायक तशाच अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत. शेवटी एक निरागस, शांत स्वभावाची आई, सून, पत्नी या साऱ्या भूमिकेतून रूपाली निवृत्त झाली ती कायमची. ही वस्तुस्थिती स्विकरण्या पलीकडे काहीही उरले नाही हे तेव्हढच खर! रूपाली गेली ती अनेक प्रश्न निर्माण करून , सर्वांना आश्चर्याचा धक्का देवुन गेली.

*तळई गावं झाले सुन्न!*
*कडक बंद!*
मयत रुपालीचे पती बळवंत पाटील हे पोलिस दलात उपनिरीक्षक या पदावर मुंबई येथे कार्यरत आहेत. त्याचा मनमिळावू स्वभाव व सर्वांना सहकार्याची भावना यामुळे त्याच्या कुटुंबियावर गावकऱ्यांचे खुप प्रेम आहे. मुंबई येथे गावातील उपचारासाठी जाणारे रुग्ण, व ईतर कामासाठी जाणाऱ्या सर्वानाच नेहमीच बळवंत पाटील सर्व प्रकारची मदत करत असतो. मुंबईत बळवंत पाटील म्हणजे तळईकरांचा एक मोठा आधास्तंभ मानला जातो. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांबद्दल गावातील सर्वानाच आदर आहे. गावात मोठा भाऊ राहुल पाटील देखील सामजिक कार्यात नेहमीच प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत असल्याने गाव त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या या प्रसंगाने निशब्द झाले आहे. जशी ही वार्ता गावात पोहचली. तसे गावातील सर्वच दुकाने बंद झाली. रूपाली जणू काही प्रत्येकाच्या कुटुंबाची एक सदस्यच होती या भावनेणे सर्व गाव शोकाकुल झाले. अशा या कुटुंबावर असा प्रसंग ओढवल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

*पुरोगामी संदेश परीवारा कडून भावपुर्ण श्रध्दांजली…!*