मांडवा येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने सरपंचासह ग्रा.पं. महिला सदस्यांना साडी वाटप व वृक्षारोपण

35

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.1ऑगस्ट):- लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सरपंचासह ग्रा.पं. महिला सदस्यांना साडी वाटप व वृक्षारोपण करून जयंती साजरी ग्राम परिवर्तन समितीचा स्तुत्यपुर्ण उपक्रमाची सर्वत्र आदरयुक्त चर्चा होत आहे.
पुसद तालुक्यातील मांडवा येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय मांडवा येथे साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवंराच्या हस्ते पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी मांडवा ग्रामपंचायतमध्ये सरपंचासह ग्रा.पं.सदस्य महिला ७ आहेत.ह्या मासिक मिटिंग, ग्रामसभा,१५ आँगष्ट,२६जानेवारी या कार्यक्रमामध्ये एका वेषभूषात दिसाव्यात या हेतूने एका रंगाच्या साड्या भेट दिल्या.त्यानंतर स्मशानभूमीत फायकस, जेट्रोफा,बटमोगरा,अशोका,सप्तपर्णी , पाम,करंदळी,चाफा,ईत्यादी ३९ वृक्षांचे रोपण करण्यात आले.

अण्णाभाऊ साठे चौक येथे येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहिर अण्णाभाऊ साठे ,छत्रपती शिवाजी महाराज,वस्ताद लहुजी साळवे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर बिरसा मुंडा,कै.वसंतराव नाईक या महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन करून सरपंच अल्का ढोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर दिशा गजभार व दिलीप आडे यांनी थोडक्यात प्रकाश टाकला.

यावेळी सरपंच अल्का ढोले, उपसरपंच विजय राठोड, सचिव मंगेश देशमुख, ग्रा.पं.सदस्य गोपाल मंदाडे, कमल राठोड,कविता आडे,संगिता गजभार, शालिनी धाड,जयश्री आबाळे, आरती पुलाते,आय.सी.आर.पी .मांडवा दैवशाला डोळस,जयश्री मंदाडे, राघोजी ढोले,नागोजी साखरे, दगडुजी ढोले,सोसायटी अध्यक्ष वसंता आडे, पांडुरंग रणखांब,तुकाराम चव्हाण,मारोती गजभार,बक्षी राठोड,साहेबराव ढोले,प्रकाश ढोले, सुरेश ढोले,कैलाश राठोड,शिवाजी लांडगे, गणपत दाढे,विलास जाधव,संजय लांडगे,पांडुरंग लांडगे, यादवराव गजभार, कैलास लांडगे, दिपक ससाणे, मारोती जाधव,प्रसाद भालेराव, रमेश ढोले, विठ्ठल आडे,रामदास गजभार, दत्ता जोगदंडे, संजय दाढे, विनोद लांडगे, प्रभाकर लांडगे, बजरंग पुलाते, देविदास गजभार, गजानन आबाळे, बजरंग राठोड,बाळु पुलाते,समाधान आबाळे,लखन दाढे, मारोती ससाणे, करण जाधव ईत्यादी ग्राम परिवर्तन समितीचे पदाधिकारी,जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य, समाजबाधंव , आणि गावकरी मंडळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रसाद घुक्से यांनी केले तर आभार योगेश पुलाते यांनी मानले.