के.एस.डी शानभाग विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

30

🔸विद्यालयाचे वक्तृत्व स्पर्धेतही विशेष यश

✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

सातारा(दि.२ऑगस्ट): – सातारा येथील श्याम सुंदरी रिलीजियस अंड चॅरिटेबल ट्रस्ट च्या के. एस. डी शानभाग विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणेच शैक्षणिक गुणवत्तेचे बरोबर इतर ठिकाणीही उत्तुंग यश मिळवले आहे. विद्यालयाची चौथीत शिकणाऱ्या कु.रेवा लाड या छोट्या बाल चित्रकाराने संभाजी नगर औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळवले आहे.

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत जवळवाडी आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शानभाग विद्यालयाच्या कु.वैभवी प्रवीण देशमुख या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमा या विषयावर अतिशय सुरेख विचार मांडत यश मिळवले आहे .

तसेच विद्यालयाचा 2020 आली इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेला ध्रुव व सचिन पटवर्धन या युवा वाक्याने संतांचे आपल्यावर असलेले उपकार या विषयावर याच जिल्हास्तरीय स्पर्धेत अतिशय प्रभावी विचार मांडून यश मिळवले आहे शानभाग विद्यालयाच्या वतीने शाळेचे कामकाज आणि शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने सुरू असून शिक्षणाबरोबरच मुला मुलींसाठी ऑनलाइन प्रकारात विविध उत्सव तसेच स्पर्धांचे आयोजन करण्याचे कार्य सुरू आहे विद्यालयांमध्ये आषाढी एकादशी जागतिक योगा दिन चित्रकला स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान विद्यालयाच्या वतीने शारीरिक शिक्षणाचे लाईव्ह टेलिकास्ट असलेले प्रशिक्षण वर्ग सुरु असून शालेय मुला-मुलींनी संपूर्ण वेळ सक्रीय व्हावे यासाठी त्यांच्याकडून शैक्षणिक कार्यक्रमाबरोबरच संपूर्ण शरीराचे व्यायाम, डोळ्याचे व्यायाम व मानेचे व्यायाम, हाताचे तसेच बोटांचे व्यायाम ऑनलाईन करून घेतले जातात.

 या सर्व विशेष क्लास साठी मुला मुलींचे पालक हि मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती विद्यालयाच्या संचालिका सौ .आचल घोरपडे यांनी दिली .

दरम्यान शाळेने मिळवलेल्या चित्रकला वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल शाळेचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग शाळेच्या संचालिका सौ. आचल घोरपडे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा गायकवाड प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी यांच्यासह पालक संघाचे प्रतिनिधी शालेय व महाविद्यालय शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी या मुला मुलींचे कौतुक  करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

– — —
शिर्षका वरील चित्र हे कुमारी रेवा लाड ने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत काढलेले हे चित्र पुरस्कार विजेते ठरले आहे.