धानोरा महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम

30

🔹बारावी बोर्ड परीक्षेचा शंभर टक्के निकाल

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.5ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच एच.एस.सी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून या परीक्षेत शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा या महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.या निकालाने धानोरा महाविद्यालयाने या वर्षी ही आपली यशाची परंपरा कायम राखली असून या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.
धानोरा येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातुन यावर्षी २७७ विद्यार्थ्यानी परीक्षेचा फॉर्म भरला होता.यामध्ये २६३ विद्यार्थी हे विशेष प्राविण्य तर १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करून दहावी,अकरावी व बारावीचे अंतर्गत मूल्यमापन करून त्या आधारे विद्यार्थ्यांना गुणदान दिले होते.या महाविद्यालयातील कला,वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे.

विज्ञान शाखेतून – कु.शेख सालेहा निसार ५७० गुण (९५ टक्के) प्रथम,कु.शेख अफ्रिन युनूस ५६६ गुण (९४.३३ टक्के) द्वितीय,कु.पठारे योगिता सुनिल ५६५ गुण (९४.१६ टक्के) तृतीय क्रमांक पटकावला.कला शाखेतून – कु.तागड वर्षाराणी राधाकिसन ५६४ गुण (९४ टक्के) प्रथम,नरवडे निलेश लक्ष्मण ५५० गुण (९१.६७टक्के) द्वितीय,पालवे प्रवीण राजेंद्र ५४८ गुण (९१.३३ टक्के) तृतीय क्रमांक पटकावला.वाणिज्य शाखा – कु.जावळे काजल मच्छिंद्र ५२४ गुण (८७.३३ टक्के) प्रथम,शिंदे दुर्गेश लालासाहेब ५२३ गुण (८७.६७ टक्के) द्वितीय,साळुंके प्रथमेश कैलास ५१८ गुण (८६.३३ टक्के) तृतीय क्रमांक पटकावला आहे.या वर्षी ही बोर्ड परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी आमदार तथा शिक्षणमहर्षी भीमसेन धोंडे,प्राचार्य कैलास वायभासे,स्टाफ सेक्रेटरी तथा पत्रकार प्रा.निसार शेख,परीक्षा विभाग प्रमुख प्रा.राजू शेलार,प्रा.विवेक महाजन,प्रा.रत्नमाला तरटे,प्रा.शबाना शेख,प्रा.गहिनीनाथ एकशिंगे आदींनी अभिनंदन केले आहे.