आ.सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते सायकलींचे अनुदान वाटप

29

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.5ऑगस्ट):- गत दोन वर्षांपासून दप्तर दिरंगाई व लाल फीत शाहीमुळे मुलींना देण्यात आलेल्या कुलूमखेड येथील शालेय विद्यार्थीनिंचे सायकलींचे रखडून ठेवलेले अनुदान आ सौ श्वेताताई महाले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.दि . 4 ऑगस्ट 2021 रोजी आ सौ श्वेताताई महाले यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 17 मुलींना सायकलींचे धनादेश वाटप करण्यात आले .

यावेळी बुलढाणा भाजपा तालुका अध्यक्ष ऍड सुनील देशमुख , तालुका युवा अध्यक्ष योगेश राजपूत, शालिकराम कानडजे, संदीप पालकर, विलास पालकर, तुळशीदास कानडजे, समाधान पालकर, भागवत पालकर, कृष्णा जाधव , विशाल विसपुते, यांची उपस्थिती होती तर कुलूमखेड व सातगाव म्हसला येथील वैशाली कानडजे, मेघा मुळे, प्रियंका दुतोंडे, कोमल सुसर, शितल सोनवणे, निकिता पानपाटील, अश्विनी कानडजे, कोमल कानडजे, साक्षी कानडजे, सरला कानडजे, रूपाली कानडजे, अश्विनी कानडजे, आकांक्षा कानडजे, पुनम दुतोंडे, अश्विनी पवार, लक्ष्मी शिंदे, कविता कानडजे यांना प्रत्येकी 4300 रु चे धनादेश वाटप करण्यात आले.

दोन वर्षांपासून अनुदान रखडले कसे ? आ सौ श्वेताताई महाले यांचा सवाल महिला व बाल कल्याण विभागाच्या सेस फंड योजने अंतर्गत सन 2018-2019 मध्ये लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान (D.B.T.) योजने अंतर्गतलेडीज सायकल लाभासाठी कुलूमखेड येथील 17 विद्यार्थीनीची निवड झाली होती . सर्व लाभार्थी यांनी सायकलीं सुद्धा खरेदी केल्या होत्या परन्तु दोन वर्षे होऊनही दप्तर दिरंगाई आणि लाल फित शाही मुळे लाभार्थी यांना त्यांचे अनुदान मिळाले नाही . ही बाब आ सौ श्वेताताई महाले यांना माहिती होताच त्यांनी दि 1 ऑगस्ट रोजी उपकार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण यांना फोनव्दारे विचारणा केली . अन चक्रे फिरली . टेबल सहित फायली सरकल्या अन दोन वर्षांपासून रखलेले सायकलींचे अनुदानाचे धनादेश तयार झाले . अन आज आ सौ श्वेताताई महाले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.