चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पदे संचमान्यतेत दर्शविण्यासाठी शिक्षण संचनालाय पुणे ला दिले निवेदन

59

🔹मा शिक्षणाधिकारी जी प चंद्रपूर यांच्या मार्फतीने दिले निवेदन

✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)

नेरी(दि.6ऑगस्ट:- शालेय संच मान्यता मध्ये शालेय चतुर्थ श्रेणी पदावर कार्यरत कर्मचारी वर्गाची सन 2019 -20 व 20-21 या वर्षात पदे दर्शविण्यात आली नाही ती पदे या संचमान्यतेत दर्शविण्यात यावी या कर्मचाऱ्यांना डावलू नये यासाठी शिक्षणाधिकारी जी प चंद्रपूर याच्या मार्फत शिक्षण संचनालाय पुणे याना शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष श्री मोरेश्वरजी वासेकर आणि संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले.

सविस्तर असे की सन 2019 पूर्वी शालेय संच मान्यते मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे दर्शविण्यात येत होती प्रत्येक वर्षांच्या संच मान्यतेमध्ये शालेय घटकातील विद्यार्थी पासून तर शिक्षक आणि चतुर्थ कर्मचारी शिपाई पर्यंत सर्व घटकांचा समावेश होता परंतु सण 2019 पासून तर 2021 पर्यंतच्या शालेय संचमान्यते मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे दर्शविण्यात आली नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून तो दूर करण्यात यावा कारण शालेय घटकात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजे शिपाई हे महत्वाचे घटक आहेत.

त्यांच्यामुळेच शालेय परिसर स्वच्छ असतो शालेय कामकाज सुरळीत चालतो विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहते शाळेचा हा महत्त्वपूर्ण दुवा आहे त्यांना डावलता येणार नाही तेव्हा शालेय संच मान्यतेमध्ये त्याची पदे दर्शविण्यात यावी यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोरेश्वरजी वासेकर व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी जी प चंद्रपूर यांच्या मार्फतीने शिक्षण संचनालाय पुणें याना निवेदन दिले यावेळी निवेदन देताना शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे सचिव हजारे, पायपरे ,चौधरी,भुरसे, शिवरकर आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते