नऊ वेळा रक्तदान करून पत्रकार अनिल कांबळे यांच्या वाढदिवस साजरा

41

✒️चांदू आंबटवाड(नायगाव ता.प्रतिनिधी)मो:-9307896949

कुंटूर(दि.14आँगस्ट):-नायगाव तालुक्यातील कुंटुर येथील समाज सेवक समाजासाठी देणे लागतो म्हणून सामाजिक बांधिलकी जपणारे असंख्य तरुण पाहिले पण लहान वयापासून समाजसेवेचे व्रत घेऊन जगणारे फार कमी आहेत, अनिल कांबळे या 37 वर्षाच्या युवकांनी रक्तदान क्षेत्रात नऊ वेळा रक्तदान करून आपला 37वा वाढदिवस साजरा करणार आहेत, त्यांनी दि किरसेंट ब्लड बँक, जीवन आधार ब्लड बँक, गोळवलकर गुरुजी ब्लड बँक,. गुरु गोविंदसिंगजी ब्लड बँक, या बँक व ब्लड कॅम्प मध्ये सहभाग घेऊन रक्त दान केले.

त्यांच्या वयाच्या विचार करता एखाद्याला भविष्यातील जीवनदान मिळावे या साठी केलेले कार्य म्हणजे त्यांची सामाजिक बांधिलकी होय, सुखात जवळ येणारे दुःखात एकही पाठीमागे नसतात पण कांबळे यांच्या मागे पत्नी म्हणून दोघांनीही नऊ वेळा रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा केला व पुढे एक आदर्श निर्माण केला असून समाजामध्ये जगत असताना भेट म्हणून आपल्या रक्ताचा थेंब देणे हे समाजसेवेचे उत्कृष्ट कार्य मानले जाते ,समाजसेवेची आवड होती गरीब व होतकरू व गरजू महिला पुरुष विधवा, अपंग लोकांना ते मदत करतात व त्यांना योजना व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतात, याची पुरेपूर प्रयत्न करतात.

लोकांना पेन्शन योजना लाभ मिळवून दिला असून त्याचबरोबर समाजासाठी एक उल्लेखनीय कार्य करत आहेत. आपल्या गरीब महिला पुरुषांच्या कामासाठी समाज सेवेसाठी हजर असतात त्यांना महिला बचत गटाच्या उत्कृष्ट बातमी व वृत्तसंकलन केल्यामुळे राज्यपाल व सामाजिक न्याय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मानाचा पुरस्कार मुंबई येथे मिळाला, त्यामुळे अनिल कांबळे यांचें सर्वत्र कौतुक होत आहे.

जगण्याच्या विविध समस्या माणसाला येत असतात मात्र समाजासाठी आपण काही तरी वेगळं केलं पाहिजे असं सतत मनात घडतं असतं. असून त्यांचे कार्य मोलाचे आहे
रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते , रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्त म्हणजे जिवंनदान आहे ,त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो , दिनांक 15/08/2021 रोजी वाढदिवस साजरा केला जात आहे. कांबळे कुंटूरकर यांच्या कार्य मोलाचे आहे.