अल्फा अँड ओमेगा बहूउद्देशीय सेवाभावी संस्था जालना तर्फे दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी ‘करियर मार्गदर्शन व सत्कार समारंभ’

30

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)

जालना(दि.15ऑगस्ट):-अल्फा अँड ओमेगा बहूउद्देशीय सेवाभावी संस्था जालना दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीचा ‘करियर मार्गदर्शन व सत्कार समारंभ कार्यक्रम’ घेण्याचे नियोजित करण्यात आले असून त्याकरिता ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. अल्फा अँड ओमेगा बहूउद्देशीय सेवाभावी संस्था जालना’ तर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात संस्था शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, वैद्यकीय, सामाजिक इत्यादि विविध कार्यात सन २०१२ पासून कार्यरत असून विशेष म्हणजे मागील कार्यक्रम प्रसंगी कोरोना असताना सुद्धा आपल्या सर्वांच्या मदतीने शासन नियम पाळून नेहमी घेण्यात येणारा दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठीचा ‘करियर मार्गदर्शन व सत्कार समारंभ कार्यक्रम’ घेण्यात आला.

सदर कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद राहिला. उद्देश हाच आहे की, आपला समाजातील विद्यार्थी/युवक कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता पुढे राहिला पाहिजे. त्यासाठी त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे, तसेच एक कौतुकाची थाप म्हणून त्याचा उत्साह वाढवावा याकरिता त्यांचा सत्कार करून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन पुढील भविष्यासाठी प्रोत्साहित करतो. तसेच समाजातील विविध क्षेत्रातील कार्य करणारे आजी माजी अधिकारी, मान्यवर यांचाही उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जातो. ‘करियर मार्गदर्शन व सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे संस्थेचे हे ४ थे वर्ष असून आतापर्यंत विविध क्षेत्रातील अनुभवी अधिकारी तसेच मान्यवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

पुष्कळ विद्यार्थ्यांना यातून चांगला फायदा झाला असून त्यांनी करियर मार्गदर्शनातून योग्य करियर निवड केलेली आहे. तसेच संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना योग्य समुपदेशन(कौन्स्लिंग) करण्यात येते. तरी या वर्षी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीचा ‘करियर मार्गदर्शन व सत्कार समारंभ कार्यक्रम हा येत्या काही दिवसात घेण्याचे निश्चित झाले असून त्याकरिता विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांची लिंक ही https://forms.office.com/r/GbdW1G0SeS असून ज्यांना फॉर्म संबधित काही अडचण असल्यास त्यांनी कृपया व्हाट् स अप मोबाइल क्र. 9011008475 या क्रमांकावर आपला

SSC, HSC, MCVC, ITI, POLYTECHNIC चा मार्कमेमो हा पाठवावा. तसेच आपली माहिती मेसेज करावी. ऑनलाइन नोंदणीची १८ ऑगस्ट २०२१ शेवटली तारीख आहे.तरी या माध्यमातून जालना जिल्ह्यातील समाजामधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिपक निर्मल यांनी केली असून कार्यक्रम हा यशस्वी होण्याकरिता संस्थेच्या सचिव डॉ. एम.के.काळे, तसेच संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री राजेश निर्मल सर, सूरज रोडे, अविनाश कांबळे सर, सुशील पाखरे, आलेक जेकब, रोहित पाखरे, दिनेश पाटोळे, आशीष पाटोळे, शीतल अंभोरे सर, उदय वैरागर सर, सुमित शर्मा सर, सॅम्युअल काळे, विनोद लोंढे, सुहास सूर्यवंशी, जॉन अॅंथनी, दिनेश निर्मल, आश्विन बेराडो, नितिन गायकवाड, बाबा कसबे, गणेश पांगारकर सर, दिपक शेळके यांचे सहकार्य असून रेव्ह. पी.के. आकसाळ, श्री. विवेक दादा निर्मल, रेव्ह. म्हंकाळे, रेव्ह. शेजुळ, रेव्ह. जाधव, रेव्ह, भालेराव, श्री. साठे सर, श्री.वसंत गायकवाड सर, श्री. अनिल पाखरे, श्री. राजेश निर्मल, श्री. विलास कांबळे, श्री. लेव्ही दादा निर्मल यांचे विशेष मार्गदर्शन असणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष यांनी दिली आहे.