पं.स.सभापती संजय वलकले यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते जाहीर सत्कार

31

✒️तालूका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.१५ऑगस्ट):-आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली. याच ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून घरकुल आवास योजनेमध्ये देगलूर तालुका हा नांदेड जिल्ह्यामध्ये द्वितीय आल्यामुळे व कोरोना काळामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल देगलूर पंचायत समितीचे सभापती संजय ग्यानोबा वलकले यांचे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी नांदेड जिल्हयाचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, विधान परिषद आमदार अमर राजूरकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जि.प. सि.ओ. वर्षाताई ठाकूर, जि.प.अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.