देगलूर येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रा.उत्तमकुमार कांबळे मित्रपरिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

31

✒️तालूका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.१५ऑगस्ट):-आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले. यानिमित्त देगलूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमीत्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन प्रा.उत्तमकुमार कांबळे मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक देगलूर तहसिलचे तहसिलदार विनोदजी गुंडमवार यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार,भाजपा युवामोर्चाचे शहरअध्यक्ष अशोक लालू कांबळे,भारतीय जनता पार्टीचे देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीचे इच्छूक उमेदवार प्रा. उत्तमराव कांबळे,पत्रकार महादेव उप्पे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जावेद अहेमद,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास येसगे ,विशाल बोरगावकर , कार्यक्रमाचे आयोजक विकास नरबागे सामाजिक कार्यकर्ता,व रक्तदाते उपस्थित होते.
या शिबीराचे औचित्य साधून देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीचे भारतीय जनता पक्षाचे इच्छूक उमेदवार प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जनतेला शुभेच्छा देत या रक्तदानाचे महत्व पटवून दिले.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दाण आहे.यात जातपात,धर्म काहीच नसतो. यावेळी त्यांनी एकच आवाहान केले की जात पात विसरून रक्तदान करा, या आपल्या रक्तामुळे कित्येक जनाचे जिव वाचू शकतो व याची या काळाला नित्तांत गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजक विकास नरबागे यांनी या कार्यक्रमाचे विशेष महत्व असल्याचे सांगितले. या भव्य रक्तदान शिबीरात ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिम्मीत वेगवेगळे कार्यक्रम घायचो पण आमच्या मित्रांमध्ये वेगळी संकल्पना आली व या कार्यक्रमाचे आयोजन केले.