दौलापुर येथे तलाठी गजानन चमकुरे यांचा सत्कार

36

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.16ऑगस्ट):- तालुक्यातील माचनूर दौलापुर नागनी येथील तलाठी गजानन चमकुरे यांची नायगाव तालुक्यातील लांलवडी सज्जाचे तलाठी म्हणून प्रशासकीय बदली झालेली आहे.त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या या अधिकाऱ्यांचा दौलापुर येथील गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

गजानन चमकुरे हे गेल्या नऊ वर्षा पासून बिलोली तालुक्यात लहान थोरापासुन सर्वाना एक चांगली सेवा देणारा अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली.विधानसभा लोकसभा निवडणूक असो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो यात वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी नेटाने पार पाडून आपले कर्तव्य पार पाडले.

अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या बदलीमुळे अनेकांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रामुख्याने उपस्थित गणपतराव पाटील टेकाळे युसुफ शेख सरपंच प्रतिनिधी सैलानी शेख उपसरपंच नामदेव पाटील ग्रामसेवक श्रीहरी खतगावे माझी सरपंच शंकर शामंते भिमराव पाटील टेकाळे पत्रकार प्रल्हाद पाटील माधवराव पा देगावे रमेश मोरे दत्ताहारी देगावे मधुकर पाटील टेकाळे गजानन कदम बालाजी येलगंद्रे प्रविण टेकाळे विलास मोरे साहेबराव पाटील शंकरराव पाटील मोरे आदी गावकरी बहुसंख्येने संख्येने उपस्थित होते