शब्दशृंगार साहित्य मंच (महाराष्ट्र) स्पर्धेचा निकाल जाहिर

31

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.16ऑगस्ट):-महाराष्ट्रातील नावाजलेला शब्दशृंगार साहित्य मंच (महाराष्ट्र) द्वारा आषाढी एकादशी निमित्य भव्य स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचं बरोबर एकून १७३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिका मा.जयश्री चौधरी , मुबई येथून स्पर्धेला परीक्षक लाभल्या होत्या. स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला. निकालाचे बक्षिस रोख रुपये व सन्मानपत्र देऊन पुढील प्रमाणे निकाल जाहिर करण्यात आला.

प्रथम प्रथम शिवानंद सविता रत्नपारखे रोख रूपये ५०१/- पालम जिल्हा परभणी
द्वितीय विजेते निवेदिता खासनिस डोंबिवलीरोख रूपये ३०१/-
तृतिय विजेते सौरभ हिरामण अहेर , तिसगाव नाशिक रोख रूपये २०१/-
तसेच उत्तेजनार्थ ठरलेले विजेते पुढील प्रमाणे ,
प्रत्येकी रोख रुपये १०१/- एकनाथ गणेश कुलकर्णी नाशिक , कुशल पां राऊत तेल्हारा जिल्हा अकोला , रजिया इस्माईल जमादार अक्कलकोट जिल्हा सोलापूर ,
अजय रमेश चव्हाण ता. दारव्हा जि यवतमाळ , सिद्धेश राजाराम पाटील जि. कोल्हापूर
शब्दशृंगार साहित्य व्यासपीठ हे महाराष्ट्रातील साहित्यिकांना खरोखर एक व्यासपीठ लाभले , व अनेक नवोदित साहित्यिक या साहित्य मंचावर घडत आहेत.

असे समुहातील सदस्यांनी व्यक्त केले. शब्दशृंगार साहित्य मंच अनेक स्पर्धा तसेच नव नविन उपक्रम राबवत असतो. स्पर्धेला अर्थसाहाय्यक मा.श्री प्रणव बनसोड जोशी (पिके) डायरेक्टर – एडवायजर सोल्टेक व्हाईटफिल्ड बैगलोर वरुन लाभले होते. तसेच संकलनकर्ते मा. सचिन गणपत मुळे परभणी येथून व ग्राफिक्सकार क्रिडा शिक्षक मा.श्री विजय बामगुडे सर लाभले. या स्पर्धेच्या द्वारे ई बुक प्रकाशन होणार असून ई बुक प्रकाशक मा.श्री अंगद दराडे सर बीड येथून प्रकाशन करणार आहेत. त्याच बरोबर सर्व अनेक नावावंत साहित्यिकांद्वारे विजेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

तसेच साहित्य क्षेत्रात नावाजलेले साहित्यिक मा.श्री लिलाधर दवंडे , मा.श्री.नरेंद्र गुळघाने , मा.श्री दिलीप काळे ,मा.श्री गजानन काकडे , मा.श्री दिनेश मोहरील यांनी देखिल सर्व सरस्वत विजेते साहित्यिकांना शुभेच्छा दिल्या. त्याचं बरोबर शब्दशृंगार साहित्य मंच (महाराष्ट्र) भव्य दिव्य साहित्य सम्मेलन घेणार आहे , व असेच नवनविन उपक्रम शब्दशृंगार साहित्य मंच घेणार आहे. असे आव्हान संस्थापक सुप्रसिद्ध साहित्यिक/ गीतकार /एक्टर -विशाल पाटील वेरूळकर यांनी व्यक्त केले व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या!