कांग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांना न्याय देणारी : नामदेव उसेंडी

19

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.16आगष्ट):-देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून साठ वर्षांच्या काळात सर्वसामान्य जनतेला विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांना न्याय देण्यासाठी झटणारा पक्ष म्हणून कांग्रेसची विचारधारा ही देश हिताची असून सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी आहे असे आवाहन कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ .नामदेवराव उसेंडी यांनीं कांग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत केले.

चामोर्शी येथे साधुबाबा कुटीतील हनुमान मंदिराच्या सभागृहात ही आढावा बैठक घेण्यात आली या बैठकी दरम्यान जिल्हा परिषद , पंचायत समिती आगामी निवडणुकीकरिता गावा गावात व नगरपंचायत प्रभाग निहाय बूथ केमेट्या तयार करणे , व कांग्रेस पक्षाची विचारधारा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून गावा गावात पोहचविणे या बैठकीतचर्चा करण्यात आली.

यावेळी गडचिरोली कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ .नामदेवराव उसेंडी ,माजी प .स.सभापती किसनराव शेट्ये , अशोक चलाख , महेंद्र म्हशाखेत्री , प्रदेश सदस्य राजेश ठाकूर , ग्राम संवाद सरपंच संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भगत ,माजी न .प.सभापती विजय शातलवार ,जिल्हा परिषद सदस्य कविता भगत ,प .सदस्य धर्मशिला सहारे , माजी उपसरपंच नितीन वायलालवार , डॉ प्राचार्य डॉ.हिराजी बनपुरकर ,माजी नगरसेवक वैभव भिवापूरे , जिल्हा महामंत्री कालिदास बुरांडे , सरपंच नीलकंठ निखाडे , संजय पंदीलवार , माधव घरामी , संचालिका लता गोवर्धन , युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष लोकेश शातलवार , मदन मडावी , नंदाजी रायशीडाम , कृष्णा नैताम , यशवंत त्रिकांडे , उपसरपंच राहूल पोरटे , राजू धोडरे , नाजुक वाळके , प .स .सदस्य शंकर आक्रेडीवार ,प्राचार्य बिधान बेपारी , प्रा .रत्नाकर बोमिडवार , संजय वडेट्टीवार , पंकज वायलालवार , डिंपल उंदिरवाडे , अविनाश चलाख , देवीदास बुरांडे , लोमेश व्यहाडकर , गोकुळ वासेकर , शंकर मारशेट्टीवार , श्रावण दूधबावरे, तालुका उपाध्यक्ष उमेश कुमरे , संजय वडेट्टीवार ,यासह तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .चामोर्शी कांग्रेस कमेटी आढावा बैठकी दरम्यान माजी मुख्यमंत्री दिवंगत विलास देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

कार्यक्रमाचे प्रस्ताविक कांग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद खोबे यांनी केले तर संचालन गुरुदेव सातपुते आभार कृष्णा नैताम यांनी मानले . तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला .