शिक्षक सन्मान अभियान संघाच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी शेख सिराज यांची एकमताने निवड

20

✒️सौ.सरस्वती लाड(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.16ऑगस्ट):-शिक्षक सन्मान अभियान संघ,महाराष्ट्र या शिक्षक संघाच्या राष्ट्रनिर्मितेच्या उद्देशाने दि.१५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्योत्सव कार्यक्रमात संघाचे संस्थापकअध्यक्ष मा.विजय ढाकुलकर यांनी अंबाजोगाई तालुक्यातील जि.प.हायस्कूल डिघोळआंबा या प्रशालेतील विविध पुरस्कार विजेते शिक्षक शेख सिराज यांची एकमताने निवड करण्यात आली.सदरील निवडपत्र शेख सिराज यांना प्राप्त झाले आहे.यापूर्वी शेख सिराज यांनी विविध शिक्षक संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून उत्कृष्ट काम केलेले आहे.

तसेच बीड जिल्हा शिक्षण विभागाचे स्मार्ट पीटी चे उत्कृष्ट प्रसिद्धीचे काम केल्याबद्धल उत्कृष्ट प्रसिद्धी पुरस्कार सन्मान प्राप्त केला आहे.शेख सिराज यांनी बीड आकाशवाणीवर विविध विषयावर व्याख्यान दिलेले आहे.शेख सिराज यांनी साक्षरता सप्ताह यामध्ये विविध सदराच्या माध्यमातून विविध वर्तमानपत्रात लेखन केले आहे.

विविध वर्तमान पत्रात सामाजिक लेखन करीत आहेत.ते एक धडपडणारे शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे.त्यांचे सामाजिक,शैक्षणिक,साहित्य क्षेत्रात योगदान महत्वपूर्व आहे.शेख सिराज यांचा शिक्षक सन्मान अभियान संघाच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी एकमताने निवड झाल्याबद्वल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.