भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पोलीस बांधव, माजी सैनिक व कोरोना योद्धांना राखी बांधून अभिनवपणे रक्षाबंधन साजरे

26

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.22ऑगस्ट):; कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधव, आरोग्य अधिकारी, कर्मचारी व भारतीय सीमेच्या रक्षणार्थ कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांना भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशन चिखली, ग्रामीण रुग्णालय चिखली, पोलीस स्टेशन अमडापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र उंद्री, प्राथमिक आरोग्य केंद्र एकलारा, प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र केळवद याठिकाणी जावून कोरोना योद्धांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

यावेळी सभापती सौ सिंधुताई तायडे, सौ मनिषाताई सपकाळ पंचायत समिती सदस्य, नगरसेविका सौ. विमलताई देव्हडे, अर्चनाताई खबुतरे, मंगलाताई झगडे, सौ. सुनिताताई भालेराव शहराध्यक्ष महिला मोर्चा, सौ. द्वारका ताई तालुका अध्यक्ष महिला मोर्चा, सुनंदाताई शिनगारे, कुंदाताई सावंत, सुलोचनाताई शेळके, गंगाताई तायडे, संगीताताई तायडे, कांचनताई मुर्हाळ, रेणुकाताई सावंत, ज्ञानेश्वरी केसकर, संगीताताई दुधाळे, पद्मा मुळावकर, रजनी बेलोकर, विमलताई पाटील, सुनिताताई शिवतारे, नंदाताई यंगड, रंजनाताई पैसोडे, प्रतिभाताई शिवतारे,वैशालीताई बेलोकर, राधाताई कापसे व इतर यांची उपस्थिती होती.