जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे प्रहारच्या नेतृत्वातील सफाई कामगारांचे आमरण उपोषण स्थगीत

26

✒️गडचिरोली,जिल्हा प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.25ऑगस्ट):-नगरपरिषद अंतर्गत कंत्राटदारामार्फत कामावरून काढून टाकलेल्या त्या जुन्या सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे या प्रमुख मागणीसह कामगारांच्या न्याय मागण्यासाठी प्रहारचे आरमोरी तालुका अध्यक्ष निखिल धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली अन्यायग्रस्त कामगार आज दिनांक २४ आगस्ट पासून सकाळी ११.०० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसताच गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी यांनी सात दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन प्रहार सफाई कामगारांना दिल्याने तात्पुरते उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

कामगार राज्यमंत्री व कामगार आयुक्त यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे, कामगार राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांच्या आढावा बैठकीत आम्ही कामगारांना कामावर घेण्यास तयार आहोत असे कबूल करूनही व कामगार आयुक्त यांनी कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिल्यानंतरही त्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या मुख्याधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, कामगार आयुक्तांनी आदेश देऊनही कामावर न घेणाऱ्या व आदेशाची पायमल्ली करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यायग्रस्त कामगारांना कामावर घेण्याचे आदेश देऊन कंत्राटदार यांच्या चुकीने चार महिने कामावरून खाली राहावे लागल्याने तेवढी नुकसान भरपाई कंत्राटदार व मुख्याधिकारी यांच्याकडून वसूल करून देण्यात यावी.

शासकीय वाहने नगरपरिषद च्या मालकी हक्काच्या जागेत ठेवण्यात यावे ,बोगस परवाना दाखवून कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्यात यावे,कामगारांना सर्व शासकीय सोयीसुविधा मंजूर असताना ते न मिळाल्यामुळे ते मंजूर करण्यात यावे,मजुरांचा इ पी एफ दर महिन्याला भरून त्याची मजुरांना रीतसर पावती देण्यात यावी,आदी विविध मागण्यांसाठी प्रहारचे वतीने अन्यायग्रस्त कामगारांना घेऊन आमरण उपोषण केले जाणार आहे व त्यासंबंधी चे निवेदन प्रहार चे आरमोरी तालुका अध्यक्ष निखिल धार्मिक यांनी अप्पर जिल्हा प्रशासनाकडे निवेदनातून केले होते.

आणी आज दिनांक २४ आगस्टला सकाळी ११वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार सेवक निधील धार्मिक यांच्या नेतृत्वात सफाई कामगार आमरण उपोषणाला बसले असता याची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी पाचारण करुण आरमोरी नगरपरीदेच्या सफाई कामगारांशी चर्चा करुन सोमवार पर्यंत तोडगा काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने तात्पुरते जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात येत असलेले उपोषण स्थगीत करण्यात येत आहे.
यावेळी प्रहार सेवक निखिल धार्मिक गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम.सफाई कामगार सघटन अध्यक्ष अक्षय भोयर.कायाध्यक्ष पुषोतम बदोले. सुभाष रामटेके अविनाश ऊईके राजेश मुन सुनिल मेत्राम भाऊराव दिवटे सचिन बोदलकर हरीदास गराडे रीना बाबोळे रेखा कांबळे.कुसुम मेत्राम ताराबाई खोब्रागडे ‌विजेता खोब्रागडे यासह मोठ्या संख्येनी उपोषणकर्ते उपस्थित होते.