शिळवणीच्या लोकांची तहान लवकरच भागनार रमेश देशमुख शिळवणीकर यांच्या प्रयत्नाला यश

29

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.२५ऑगस्ट):-देगलूर तालुक्यातील शिळवणी येथील जनतेसाठी पाण्यासाठी खूप हालअपेष्ठा होत होती.शिळवणी येथील महिला,लहान लहान मुले पाण्यासाठी कोसोदुर जात होते.या गोष्टी लक्षात घेऊन शिळवणी येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश देशमुख शिळवणीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.संजय बनसोडे यांची दोन महिण्याखाली लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शिळवणी येथील पाण्याचे प्रश्न उपस्थित केले.

ना.संजय बनसोडे यांनी शिळवणी येथील पाण्यासाठी होणाऱ्या भटकंती विषयी गंभीर चर्चा करून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ योजनेसाठी जवळपास एक कोटी त्र्याहत्तर लाख एक्कोनपन्नास हजार रूपयाचा निधी मंजूर करून देण्यात आले. रमेश देशमुख शिळवणीकर हे शिळवणी येथील गावाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रातून निधी खेचून आणत गावच्या विकासासाठी प्रयत्नशिल असतात.मागील दोन महिन्यात बस स्टँड ते शिळवणी गावात जाणाऱ्या रस्त्यासाठी वीस लाख रूपये निधी आणून रस्त्याचे काम चालू करण्यात आले.

गावातील टंचाईग्रस्त स्थिती लक्षात घेऊन निधी मंजूर केल्याबद्दल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केल्याने नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश देशमुख शिळवणीकर यांचे पद्माकर देशमुख,क्रष्णाजी देशमुख,प्रकाश भुताळे,शिवाजी माने,ज्ञानोबा माने,तानाजी देवकत्ते,सदाशिव सुर्यवंशी,बालाजी घोडेकर,बालाजी दोमाटे यांच्यासह गावातील नागरिकांच्या वतीने आभार मानले.