हिंगणघाट शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढली

25

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.27ऑगस्ट):-प्रवृत्ति डोके वर काढत असून काल मध्यरात्री शहरातील सुदर्शननगर परिसरात चाकुने जखमी करीत जबर मारहाण करण्याची घटना काल २६ रोजी रात्री घडली.घटनेत गंभीर जखमी झालेल्या याचेवर आरोपीने आणलेल्या हत्याराने छातीवर तसेच पाठीवर वार केले.जखमी झालेल्या व्यक्तिची मुलगी कु. जयश्री दशरथ मोगरे रा.सुदर्शननगर कालोनी हिंगणघाट हिने आरोपी सागर मखरे रा.स्विपर कालोनी,सुदर्शन नगर हिंगणघाट हिनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. सदर घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री दोन ८ ते ८.३० च्या दरम्यान घडली.

जखमी व्यक्ति आपल्या घरा समोर उभे असता तेथुन योगेश शेखर मखरे मोटरसायकलने जात होता,त्याच्या खिशातून पैसे पडत असतांना शिव दशरथ लालचंद मगरे यांनी खिस्यातुन पैसे पडत असल्याचे सांगितले,यावेळी तो तिथे थांबला आपले पैसे घेऊन तेथुन तो निघुन गेला थोड्यावेळा नंतर त्याचा भाऊ सागर मखरे आला व जखमीसोबत वाद विवाद करीत रस्त्यावरवर पडून असलेली वीट ऊचली व मारली व घरी जाऊन धार धार चाकू आणून छातिवर व पाठीवर वार केले.

आरोपी घटना स्थळावरुन पळून गेला . यावेळी शेजारी आले व त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व त्या नंतर सेवाग्राम येथे पाठविण्यात आले कु जयश्री मोगरे ईने पोलिस ठाण्यात तक्रार केली .आरोपी सागर शेखर मखरे विरुद्ध गुन्हा कलंम ३०७ . ५०४. दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलीस निरीक्षक सपंत चव्हान , उपनिरीक्षक पाटणकर करीत आहे