कंत्राटी आरोग्य कर्मचारी कार्यमुक्त;कोविड रुग्णांनी उपचारासाठी जायचे कोठे?

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.31ऑगस्ट):-गेले सतरा महिण्यापासुन महाराष्ट्र राज्यासह सातारा जिल्ह्यात कोव्हीड १९ या महाभयंकर रोगाने हजारोचे जिव घेतले तर आज ही लाखों लोक उपचार घेत असताना सर्वत्र पाॅजिटिव रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असताना साताऱ्यासह म्हसवड गोंदवले,दहिवडी व गोंदवले बु येथील डीसीएच,डीसीएचसी व सीसीसी या चार कोव्हीड सेंटर मध्ये रुग्णांची सेवा करणारे डाॅक्टर, आरोग्य सेवक , नर्स, कर्मचारी, स्वच्छता विभाग जवळपास ५० लोक काम करत असताना कोणती ही पूर्व सुचना न देता ३१ आॅगष्ट पासुन त्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे सांगीतल्याने म्हसवड येथे उपचार घेत असलेल्या १७२ कोव्हीड रुग्णांनी उपचारासाठी जायाचे कोठे का जिव द्यायचा असा खड़ा सवाल उपचार घेणारे पाॅजिटिव रुग्ण करत आहेत.

महाराष्ट्र राज्य मा आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी या महिण्यात शुक्रवार दिनांक २७/८/२०२१ रोजी म्हसवड सह दहिवडी, गोंदवले बु , गोंदवले खु ‌ येथील कोव्हीडच्या डीसीएच,डीसीएचसी,व सीसीसी या ठिकाणी कोव्हीड अंतर्गत कार्यरत असणारा सर्व कंत्राटी व तातपूरीत्या स्वरुपातील डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक ,स्टाप नर्स, आरोग्य सेवसह सर्व कर्मचारी यांना आपल्या स्तरावर दिनांक ३१/८/२०२१ रोजी कार्यमुक्त करण्याच्या सुचना प्राथमिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांना सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौड़ा व सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिल्याने म्हसवड सह दहिवडी गोंदवले बु गोंदवले खु या ठिकाणी असणारे सीसीसी,डीसीएच व डीसीएचसी सेंटर मध्ये कोव्हीड या आजाराने उपचार घेत असलेल्या म्हसवड येथील सीसीसी सेंटर मध्ये १७२ रुग्णा उपचार घेत आहेत तर आम्ही म्हसवडकर कोव्हीड हाॅस्पिटल डीसीएचसी मध्ये १९ रुग्ण आॅक्शीजनचे रुग्ण आहेत माणदेशी फाउंडेशनचे गोंदवले बु येथील ३९ रूग्ण तर आॅक्शीजन चे १४ गोंदवले खु मध्ये सीसीसीचे ७५ तर आॅक्शीजनचे २५ रुग्णांनी जायाचे कोठे असा सवाल कोव्हीड सेंटर मधील कर्मचारी करत आहेत कोव्हीडच्या दहशतीत स्वताचा जिव धोक्यात घालून इतराचे जिव वाचवण्यासाठी धडपडणार्या कर्मचारी यांना कामावरुन कमी केल्याचे कोणती ही पूर्व सुचना न देता आरोग्य विभाग यांनी कर्मचारी कमी करण्याचा घेतलेल्या निर्णयाने रुग्णाचे आतोनात हाल होऊन जिव ही जावू शकतो याला जबाबदार कोण असा सवाल आम्ही म्हसवडकर ग्रुप करत आहे.