प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मास्क वाटप

28

✒️अहमदनगर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहमदनगर,गणेशवाडी(दि.31ऑगस्ट):- नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे शिवचिदंबर माध्यमिक विद्यालयात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोना सारख्या महामारीच्या काळात अनेक मुलांचे पालकत्व हरवले तर कित्येकांनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्या. संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी एका बैठकी दरम्यान कोरानाने पालकत्व हरवलेल्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व गणवेश पुरविणे कामी विचार मांडले व त्याला संघटनेचे वतीने लगेचच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे यांचे मार्गदर्शनाखाली युवाध्यक्ष गणेश बेल्हेकर यांनी या कामी पुढाकार घेत गणेशवाडी येथील शिवचिदंबर माध्यमिक विद्यालयात याची सुरुवात करत पालकत्व हरवलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने विद्यालयास सँनिटायझर व दिडशे माँस्क संघटनेचे पदाधिकारी यांचे हस्ते देण्यात आले.

ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे आपले पालक गमावले असतील त्या मुलांसाठी संघटना कायमस्वरूपी त्यांचे पाठीशी उभा राहणार असल्याचे संघटनेचे वतीने सांगण्यात आले. या वेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे युवा अध्यक्ष गणेश बेल्हेकर, संजय वाघ, संतोष टेमक, मोहनराव शेगर, अशोकराव भुसारी विद्यालयाचे संस्थापक दत्तात्रय लोहकरे, मुख्याध्यापक राजेंद्र लोहकरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला .