खटाव तालुक्यातील आठवडी बाजार त्वरित चालू करण्यात यावे;रिपाईकडून वडूज तहसीलदार यांना निवेदन

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.31ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्यात कोविड 19 प्रभाव वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून एप्रिल महिन्यात संपूर्ण राज्यात लॉक डाउन लावणेत आला त्या पार्श्वभूमीवर राज्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात लागू केले परंतु आजच्या परिस्थितीत कोरोना नियंत्रणात असल्याने खटाव तालुक्यातील आठवडी बाजार त्वरित चालू करण्याची मागणी तालुका रिपाई कडून केली जात आहे त्यासंदर्भात वडूज तहसीलदार यांना निवेदन देणेत आले.
कोरोना महामारीच्या काळात राज्यात कडक लॉक डाऊनची अमलबजावणी करणेत आली होती.

परंतु कोरोनाचा घटता आलेख पाहता महाराष्ट्र शासनाने नियमात शिथिलता आणत व्यावसायिक दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे मात्र तालुक्यातील आठवडी बाजार अध्याप सुरू झालेले नाहीत त्यामुळे छोटे मोठे व्यापारी,व्यावसायिक आणि।शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्याच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावेळी तंबाखू व्यापारी महेश खडके म्हणाले की जर यावेळी आठवडी बाजार चालू झाले नाहीत तर आमच्या सारख्या छोट्या व्यावसाईकावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही आमची कुटूंब उध्वस्त होतील यासाठी तहसीलदार यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन आठवडी बाजार सुरू करावेत.सातारा जिल्ह्यात काही भागात आठवडी बाजार सुरू झाले आहेत त्या निकषानुसार खटाव तालुक्यातील बाजार चालू करण्यात यावेत असे निवेदन खटाव तालुका रिपाईच्या वतीने वडूज तहसीलदार यांना देणेत यावेळी तालुका अध्यक्ष गणेश भोसले,मयूर बनसोडे,संदीप काळे उपस्थित होते.