भंगाराम तळोधी येथील व्यक्तीची विहिरीत पडून आत्महत्या

43

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.1सप्टेंबर):- भंगाराम तळोधी येथील व्यक्तीची विहिरीत पडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मृतकाचे नाव सुधाकर मोंडी मित्थावार असे असून तो व्यक्ती भं. तळोधी येथील रहिवासी आहे. राजेश्वर बिरा येग्गेवार हे आपल्या शेतात कामाकरीता सकाळी गेले असता त्यांना आपल्या विहिरीमध्ये कुणी तरी मरण पावले असल्याचे कळले.

त्यांनी गावातील पोलिस पाटील यांना सांगून गोंडपिपरी पोलिस स्टेशन येथे कळविण्यात आले. गोंडपिपरी तालुक्याचे पोलिस अधीक्षक जीवन राजगुरू साहेब आणि पोलिस अधिकारी शामराव पुलगमकार साहेब यांनी चौकशी केली असून याचा अधिक तपास सुरू आहे.