पांच परफेक्ट मास्टर्सपैकी एक!

24

(संतश्रेष्ठ ताजुद्दीनबाबा पुण्यतिथी विशेष)

मुस्लिम बांधवांच्या कॅलेंडरप्रमाणे दि.५ सप्टेंबर २०२१ रोजी ताजुद्दीन मुहम्मद बद्रुद्दीन अर्थात हज़रत बाबा सैय्यद ताजुद्दीन औलिया ऊर्फ संतश्रेष्ठ ताजुद्दीनबाबा यांची पावन पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख!

संतशिरोमणी ताजुद्दीन बाबा यांचा महिमा सुंगधासारखा सर्वत्र दरवळू लागला. त्यांच्या दर्शनासाठी लोक हजारोंच्या संख्येने नागपूर येथे येऊन गर्दी करू लागले. भक्तांना ते ताज वाटत होते. ताज शब्दाचा अर्थ म्हणजे दिव्यत्वाचा मुकूट होय. ते जीवनात सर्व क्षेत्रांत शिष्यांना एक प्रवाह व धार्मिक संरक्षणासाठीही प्रभावी ठरत होते. मेहर बाबांनी आपल्या प्रसिद्ध पुस्तकात- गॉड स्पीक्समध्ये एका परफेक्ट मास्टरच्या स्थितीसंदर्भात लिहिले, “एक सद्गुरु या कुतुब उच्चतम है और सद्गुरु की कृपा के बिना कोई भी स्वयं को महसूस नहीं कर सकता है!” ताजुद्दीन मुहम्मद बद्रुद्दीन हे भारतातील नागपूर शहरात होऊन गेलेले महान सुफी संत होत. लहान वयातच बद्रुद्दीन अनाथ झाले होते. बद्रुद्दीन ऊर्फ हजरत बाबा सैय्यद ताजुद्दीन औलिया हे महाराष्ट्राच्या नागपूर विदर्भ प्रदेशातील सुप्रसिद्ध मुस्लिम संत, त्यांना परिसरातील भक्तमंडळी संतश्रेष्ठ ताजुद्दीनबाबा असेही म्हणतात.

संतशिरोमणी ताजुद्दीन बाबांचा जन्म दि.२७ जानेवारी १८६१ रोजी महाराष्ट्र राज्यात नागपूरच्या जवळच वसलेल्या कामठी नामक वस्तीत झाला. ते मेहरबाबांच्या पांच परफेक्ट मास्टर्सपैकी एक होते. एक विलक्षण मुलाच्या रूपात ते जन्मले होते. बाबांनी आपल्या माता-पित्यांना आपल्या अल्पायुष्यातच गमावले होते. आईची आई आणि चुलते चाचा अब्दुल रहमान यांनी त्यांचे संगोपन केले. कामठीच्या एका शाळेत शिकत असताना ते तेथील एका मदरशातील आध्यात्मिक गुरु हज़रत अब्दुल्लाशाह यांच्या सानिध्यात आले. त्यांनी संत ताजुद्दीनबाबांची आध्यात्मिक क्षमता चटकन ओळखली. ते हज़रत अब्दुल्लाशाह यांच्याकडून पवित्र कुराण शिकले. तत्पश्चात इ.स.१८८१मध्ये बाबा आपल्या वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी नागपूर सेना रेजिमेंटमध्ये एका सिपाई- सैनिकाच्या रूपात भरती झाले. मास्टरचा उपहार त्यांच्या हृदयात कायम होता. सेनेच्या कामकाजात कदाचित त्यांना आधार मिळाल्यासारखे वाटले असावे. हज़रत दाऊद साहेब हे हज़रत ताजुद्दीन बाबांना आध्यात्मिक गुरु म्हणून लाभले होते. अल्लाह- ईश्वरासोबतच्या आसक्तीने ते एकाग्रता साधू लागले. त्यामुळे ते आपल्या सभोवतालच्या दुनियादारीशी अनभिज्ञ राहिले. त्यांनी भ्रमिष्टाप्रमाणे शहराच्या सडकांवर फिरणे सुरू केले होते.

हळुहळू त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना यांविषयी कळून चुकले. म्हणून त्यांना कामठीला परत बोलावण्यात आले.
बाबा अंदाजे ६५ वर्षांचे असतील, तेव्हा त्यांची प्रकृती खुपच खालावल्याची चिन्हे दिसून आली. म्हणून महाराजा राघोजीरावने बाबांच्या औषधोपचारासाठी नागपूरच्या सर्वश्रेष्ठ चिकित्सकांची सेवा-चाकरी कामी लावली. परंतु त्याचा काही एक फायदा झाला नाहीं. दि.१७ ऑगस्ट १९२५ रोजी संतश्रेष्ठ ताजुद्दीन बाबांनी आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला. तरीही ते नेहमीकरीता आपल्या समस्त भक्तांच्या हृदय मंदिरात स्थानापन्न झाले आहेत.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांच्या पाक पवित्र पुण्यतिथी निमित्त त्यांना दंडवत प्रणाम !!

✒️संकलक:-संतांची पायपुसणी: श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी[मराठी सारस्वत नागपूर विदर्भ प्रदेश]मु. एकता चौक, रामनगर- गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली- ४४२६०५.फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
इमेल- Krishnadas.nirankari@gmail.com