ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

24

🔸वंचित बहुजन आघाडी करणार डफली बजाव आंदोलना चा इशारा

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि 4सप्टेंबर):- तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना कुठल्याच प्रकारच्या आरोग्यविषयक चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने येथे येणाऱ्या गोर गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याने सामान्य गोर गरीब रुग्ण त्रस्त झाले आहेत.

अनेक वेळा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधं साठ्याचा तुटवडा निर्माण होत असल्याने रुग्णांना खाजगी मेडिकल वरून औषधे आणावी लागतात.

प्राथमिक आरोग्य केंद्रात गोळ्या औषधे तज्ञ डॉक्टर औषधी संयोजक यांचा अभाव असल्याने सामान्य रुग्णांना औषधांचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

सद्या सर्दी खोकला ताप या आजाराने डोके वर काढले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात साथ रोग आजार, संसर्गजन्य आजारावर औषध उपचार केले जातात तसेच बाह्य रुग्ण विभागात सर्दी खोकला,ताप या आजारावर तपासून औषधी दिली जातात. पण चांगली आरोग्य विषयक सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी जावे लागत आहे.त्यामुळे गोर गरीब रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका ही नादुरुस्त असल्याने लसी करण करण्यास अडचण निर्माण झाली आहे,.
नवीन इमारतीत स्थलांतरित होऊनही गेल्या अनेक महिन्यांपासून एकही प्रसूती होऊ शकली नाही. कुटुंब नियोजनाचे शस्त्रक्रिया सुध्दा होत नाहीत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त आहे. आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, औषधी संयोजक, नेत्र चिकित्सक, रुग्णवाहिका चालक यासह अन्य महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
त्यामुळे इथे असलेल्या कर्मचाऱ्यावर ताण वाढला आहे,.

प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना आरोग्यविषयक चांगल्या सोयी सुविधा मिळत नसल्या बाबत आरोग्य विभागाला व तसेच लोकप्रतिनिधींना गावातील विविध राजकीय पक्ष संघटनांनी निवेदने दिली.

मौखिक तक्रारी केल्या परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या जैसे थे असल्याने वंचीत बहुजन आघाडी ने येत्या 15 दिवसात आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या मार्गी न लावल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर आरोग्य विभागाला जागे करण्याठी डफली आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे, ढाणकी नगरपंचायत चे नगरसेवक संबोधी गायकवाड, नगरसेविका बशनुर बी सय्यद खलील, महीला आघाडी तालुका प्रमुख सीमा गायकवाड,मीनाताई गायकवाड,रेखा पाईकराव,
गोलू मूनेश्र्वर, गोंटू राऊत,अलीम कुरेशी,शाम राऊत, भाऊ पाईकराव,किरण गायकवाड, आबा गायकवाड उपस्थित होते.