बोथे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्री.रामचंद्र जगदाळे यांची बिनविरोध निवड

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9975686100

म्हसवड(दि.4सप्टेंबर):-बोथे,ता.माण,जी.सातारा या गावच्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि ३ / ९ / २० २१ रोजी सायं ८ वा . जि . प . प्रा शाळा बोथे येथे संपन्न झाली यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना तालुका संघटक सन्माननिय श्री . रामचंद्र जगदाळे यांची सर्व संमतीने बिनविरोध निवड करणेत आली.

रामचंद्र जगदाळे यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव सरपंच सौ. शोभा अविनाश जगदाळे यांनी केला या प्रसंगी गावातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी या ग्रामसभेचे सचिव म्हणून ग्रामसेवक श्री सतिश भोसले यांनी कामकाज पाहीले.यावेळी सर्व राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आणि ग्रामस्थानी रामचंद्र जगदाळे याचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED