कै.पंडीतअण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित कीर्तन महोत्सवात बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते आरती

30

🔹किर्तन ही महाराष्ट्राची जाज्वल्य प्रबोधन परंपरा -बाजीराव भैय्या धर्माधिकारी

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.5सप्टेंबर):-संत विचारांचा वारसा आणि सशक्त सकारात्मक समाजनिर्मितीचा वसा चालवण्यासाठी महाराष्ट्रात किर्तन परंपरेने अविरत प्रबोधनगंगा प्रवाहित केलेली आहे.किर्तन ही महाराष्ट्राची जाज्वल्य प्रबोधन परंपरा आहे.टि.व्ही चॅनल्सनी हे विचार आता घराघरापर्यंत पोहचविले जात आहेत.ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.परळीत कृषीमहर्षी स्व.पंडितअण्णा मुंडे स्मृती “गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा” या कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या महोत्सवात आरती संपन्न झाली.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड चे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून नगर परिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली शेमारु मराठी या अग्रगण्य मराठी चॅनलच्या वतीने कृषि महर्षी स्व.पंडितअण्णा मुंडे स्मृती “गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा” या कीर्तन महोत्सवात आजच्या सत्रात माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन श्री.गणेशाची आरती करण्यात आली.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सूर्यभान मुंडे,सामाजिक कार्यकर्ते विलास ताटे,युवक नेते सुर्यकांत मुंडे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,ह.भ.प.गोविंद महाराज मुंडे,ह.भ.प. विश्वांभर महाराज उखळीकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अतिशय सुनियोजितरित्या या कीर्तन महोत्सवाचे चित्रिकरण लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे सुरु आहे.दररोज सकाळी ८ वा.ते रात्री ८ वा पर्यंत च्या सत्रात मान्यवर किर्तनकार किर्तनसेवा बजावत आहेत.या किर्तन महोत्सवाच्या माध्यमातून भाविकांना विविधमान्यवर किर्तनकारांच्या किर्तन श्रवणाचा लाभ मिळत आहे.या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आहे.