गंगाबाई तलमले महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि. 5सप्टेंबर):-स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रा. श्रीकांत कडस्कर यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले होते. या प्रसंगी बोलताना प्रा. कडस्कर म्हणाले की, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार आपणा सर्वांना प्रेरणादायी आहेत, अज्ञानातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारी शिक्षण ज्योत अशीच प्रज्वलित राहो अशी मी या मंगलदिनी कामना करतो.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मंगेश देवढगले म्हणाले की,शिक्षण मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्यास शिकवते,या अध्ययन-अध्यापनप्रक्रियेचे आम्ही घटक आहोत याचे समाधान वाटते. या शुभदिनी माझ्या सर्व गुरुजनाना व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संतोष पिलारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. पल्लवी धोंगडे यांनी केले.या कार्यक्रमाला प्रा. जयगोपाल चोले,प्रा. संतोष पिलारे,प्रा. अश्विनी बोरकुटे,प्रा. पल्लवी धोंगडे,कनक ठोंबरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED