अनोरे विद्यालयाचे शिक्षक बी आर महाजन यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

27

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगाव(दि.6०तालुक्यातील अनोरे येथील बळीराम जीवन महाजन विद्यालयाचे विज्ञान शिक्षक बी आर महाजन यांना लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.जळगाव येथे युवा फाउंडेशन व जळगाव जिल्हा शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त जळगाव येथील लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार व कोरोना योध्दा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय गुलाब रावजी पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन, डायट चे प्राचार्य डा.अनिल झोपे ,गोदावरी फाउंडेशन चे प्राचार्य प्रशांत वारके, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, ग. स. सोसायटी चे माजी उपाध्यक्ष महेश पाटील, महानगर प्रमुख शोभाताई चौधरी, मेडिकल असोसिएशनचे संचालक डॉक्टर स्नेहल फेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

बी.आर. महाजन यांनी आपल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत विज्ञान प्रदर्शन विज्ञान,विज्ञान परिषद,इन्सपायर्ड अवार्ड या स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर शाळेचे प्रतिनिधीत्व केलेले आहे तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी मिळवण्यासाठी माध्यमिक शिक्षकांना मार्गदर्शकाचे काम करीत आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेमचंद पाटील यांनी केले तर आभार स्नेहल फेगडे यांनी मानलेत.श्री महाजन यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रातून कौतुक होत असून मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.

फोटो कॅप्शन……

अनोरे विद्यालयाचे शिक्षक बी आर महाजन यांना सरदार वल्लभाई पटेल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील सोबत माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डायटचे प्राचार्य डाॅ. अनिल झोपे,शोभा चौधरी….