बॅक आॅफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आजपासून सुरुवात

24

🔸पहिल्या दिवशी बिल्ले परिधान करून मागणी दिवस

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अकोला(दि.7सप्टेंबर):- बँक ऑफ महाराष्ट्र अर्थात महाबँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज मंगळवार ( दि .७ ) पासून आंदोलनाची हाक दिली आहे . पहिल्या दिवशी सर्व कर्मचारी बिल्ले परिधान करून मागणी दिवस पाळणार आहेत , अशी माहिती संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपञकात दिली आहे . बँक ऑफ महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी , अधिकारी , पि.टी.एस ( सफाई कर्मचारी) भावनेने काम करत अल्प काळात तोट्यातील बँकेला नफ्यातील बँकेत परावर्तित केले . रिझर्व बँकेने प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शनच्या स्वरुपात लावलेल्या निबंधातून बाहेर पडणाऱ्या बँकेत महाबँक पहिली होती.

आज महाबँकेचे नाव बँकिंग उद्योगातील उत्कृष्ट बँक म्हणून घेतले जाते . मात्र सध्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे . कर्मचाऱ्यांवरही बोजा वाढल्याने त्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहे . त्यामुळे नोकर भरती सुरू करावी ही प्रमुख मागणी आहे . या आंदोलन काळातच बँकेचा ८७ वा वर्धापन दिन साजरा होत आहे . हा दिवस ‘ ग्राहक अभिवादन दिवस ‘ म्हणून पाळणार आहोत . ज्या दिवशी शक्य त्या सर्व ठिकाणी ग्राहकाप्रती आपले ऋण व्यक्त करण्यासाठी ‘ ग्राहक अभिवादन सभा आयोजित केल्या जातील . ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशन , बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ , बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना व महाबँक नवनिर्माण सेना या सर्व संघटनांतर्फे ५ ते २० सप्टेंबर या कालावधीत सर्व महत्त्वाच्या शहरांतून संयुक्त सभा घेतली जाईल . आंदोलनात सर्वांना सहभागी करून घेतले जात आहे , अशी माहिती संघटनेचे प्रमुख धनंजय कुलकर्णी , रवींद्र जोशी , अनंत सावंत व मनमोहन राजापाटील यांनी दिली .तर अकोला झोन च्या वतीने सदर मागण्या व आदोलन यशस्वी करण्यासाठी श्री प्रविण महाजन साहेब, श्याम माईनकर साहेब , श्री अनिल माळवे साहेब व सर्व पदधिकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करित आहेत

या आहेत प्रमुख मागण्या : .

हंगामी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेऊन पीटीएसच्या रिक्त जागा भरा • सर्व पार्ट टाइम सबस्टाफला पूर्णवेळ करा • क्लार्कची पुरेशी भरती करा . प्रशासकीय बदल्यांचे परिपत्रक मागे घ्या • बँक शाखा / एटीएम ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आंदोलन कार्यक्रमः • सप्टेंबर बिल्ले परिधान करून मागणी दिवस पाळावा .८ ते १४ सप्टेंबर बँकेच्या चेअरमन यांना ई – मेल द्वारे आवाहन पत्र • १५ सप्टेंबर सर्व झोनल ऑफिसपुढे धरणे , मास डेप्युटेशन , २० सप्टेंबर ट्रिटर मोर्चा- चेअरमन , बैंकिंग सेक्रेटरी , वित्तमंत्री , भारत सरकार • २२ सप्टेंबर लोकमंगलसमोर धरणे , मास डेप्युटेशन . २७ सप्टेंबर दिवसीय देशव्यापी लाक्षणिक संप . २१ आणि २२ ऑक्टोबर दोन दिवसीय देशव्यापी लाक्षणिक संप .